esakal | Video : पंतचा एकहाती फटका, धोनी-ठाकूर बघतच राहिले | DC vs CSK
sakal

बोलून बातमी शोधा

Video : पंतचा एकहाती फटका, धोनी-ठाकूर बघतच राहिले

Video : पंतचा एकहाती फटका, धोनी-ठाकूर बघतच राहिले

sakal_logo
By
सुशांत जाधव

Delhi vs Chennai, Qualifier 1 : दुबईच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या क्वालिफायर लढतीत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली. शिखर धवन आणि अक्षर पटेल यांच्या रुपात लवकर विकेट गमावल्यानंतर पृथ्वी आणि पंतच्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने 172 धावा केल्या. पृथ्वी पाठोपाठ पंतने नाबाद अर्धशतकी खेळीनं संघाचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून प्ले ऑफमध्ये युएईतील लागोपाठ दोन अर्धशतके आली.

पृथ्वी प्रमाणे पंतनेही या हंगामात अर्धशतक झळकावले होते. पण युएईतील दुसऱ्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील एकाही खेळाडूनं चेन्नई विरुद्धच्या सामन्यापूर्वी अर्धशतक झळकावले नव्हते. युएईत पृथ्वीनं दिल्लीकडून पहिले अर्धशतक झळकावल्यानंतर याच सामन्यात कर्णधाराने नाबाद अर्धशतकी खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकार खेचले.

हेही वाचा: कोरोना झाल्यावर लोक मरणावर उठले; चक्रवर्तीनं शेअर केला भयावह अनुभव

दिल्ली कॅपिटल्सच्या 16 व्या षटकातील शार्दुल ठाकूरच्या दुसऱ्या चेंडूवर पंतने अप्रतिम षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. फुलटॉस चेंडूवर त्याने एका हाताने षटकार खेचत आपल्यातील ताकद दाखवून दिली. विकेटमागे असलेल्या धोनीसह गोलंदाजी करणारा शार्दुल ठाकूरही पंतच्या या फटक्याकडे पाहातच राहिले.

हेही वाचा: Video : अजब-गजब विकेट; चौकार मारला पण दांड्या उडल्या!

अखेरच्या षटकात शार्दुलच्या गोलंदाजीवर पंतने स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. या षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला मोठी फटकेबाजी करण्यात अपयश आले. एका चौकारासह त्याला केवळ आठ धावांच घेता आल्या.

loading image
go to top