esakal | Video: बाबोss... वेगवान रबाडाला व्यंकटेश अय्यरने पुढे येऊन लगावला षटकार
sakal

बोलून बातमी शोधा

Venkatesh-Iyer-Six

त्याने मारलेला षटकार थेट मैदानाच्या बाहेरच गेला..

बाबोss... वेगवान रबाडाला व्यंकटेशने पुढे येऊन लगावला षटकार

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR: सलामीवीर शिखर धवनची संयमी ३६ धावांची खेळी आणि श्रेयस अय्यरची ३०* धावांची खेळी याच्या जोरावर दिल्लीने कोलकाताविरूद्ध २० षटकात १३५ धावांपर्यंत मजल मारली. कोलकाताच्या गोलंदाजांनी पहिल्यापासूनच शिस्तबद्ध गोलंदाजी केली. त्यामुळे दिल्लीकरांना अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. पण कोलकाताच्या सलामीवीरांनाी मात्र दमदार फटकेबाजी केली. व्यंकटेश अय्यरने कगिसो रबाडाला लगावलेला षटकार चर्चेचा विषय ठरला.

हेही वाचा: IPL 2021: कामगिरी CSKच्या ऋतुराजची, शुभेच्छा मात्र सायलीला

पहिल्या ४ षटकात कोलकाताच्या संघाने दमदार सुरूवात केली होती. ४ षटकात ३० धावा केलेल्या कोलकाताच्या सलामीवीरांचा रथ रोखण्यासाठी रबाडाला बोलावण्यात आले होते. पण व्यंकटेश अय्यरने रबाडाला फारसा भाव दिला नाही. वेगवान रबाडाच्या गोलंदाजीवर त्याने चक्क पुढे येऊन षटकार लगावला. महत्त्वाची बाब म्हणजे तो षटकार मैदानाच्या बाहेरच गेला.

हेही वाचा: Video: युवा शिवम मावीने उडवला अनुभवी स्टॉयनीसचा त्रिफळा

प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्लीला चांगली सुरूवात मिळवून दिली. पण पृथ्वी शॉ १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्कस स्टॉयनीसही २३ चेंडूत केवळ १ चौकार लगावत १८ धावांवर बाद झाला. स्टॉयनीस बाद झाल्यावर थोड्याच वेळात शिखर धवनदेखील ३९ चेंडूत ३६ धावा काढून बाद झाला. त्याने १ चौकार आणि २ षटकार लगावले. धवननंतर कोणताही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. ऋषभ पंत ६ धावांवर माघारी परतला. शिमरॉन हेटमायरला एक जीवनदान मिळालं पण तो १७ धावा काढून धावबाद झाला. श्रेयस अय्यर शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरत २७ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या आणि संघाला १३५ धावांपर्यंत मजल मारून दिली.

loading image
go to top