Virat Kohli Set to Join Elite T20 Club with Pollard and Shoaib Malik : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात क्वालिफायर १ चा सामना होणार आहे. विराट कोहली व श्रेयस अय्यर असे दोन आघाडीचे फलंदाज आज या निमित्ताने पुन्हा समारोसामोर येतील. विराटने या पर्वात १३ सामन्यांत ६०२ धावा, तर श्रेयसने १४ सामन्यांत ५१४ धावा केल्या आहेत. कोहली RCBचा कर्णधार नसला तरी संघाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे.