Why did Virat Kohli quit as India and RCB captain
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने RCB पॉडकास्टवर मोठा खुलासा केला आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीत तो भारत व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशा दोन्ही संघाचे एकाच वेळी नेतृत्व करत होता. त्यामुळे या कालावधीत त्याच्यावर कर्णधार म्हणून अपेक्षांचं प्रचंड ओझं होतं आणि त्याच्या त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता. विराट कोहलीने अखेर भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB ) या दोन्ही संघांच्या कर्णधारपदाचा त्याग करण्याबाबत मौन सोडले आहे.