Video : विराट कोहली शुन्यावर बाद झाला अन् स्वतःवरच हसला | Virat Kohli Golden Duck | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Golden Duck

Video : विराट कोहली शुन्यावर बाद झाला अन् स्वतःवरच हसला

IPL 2022: रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giants) आज गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर जाण्यासाठी एकमेकांना भिडत आहेत. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम आरसीबीला फलंदाजी करण्यास पाचारण केले. मात्र पहिल्याच षटकात आरसीबीचे अनुज रावत आणि विराट कोहली (Viart Kohli) पाठोपाठच्या चेंडूवर बाद झाले. विशेष म्हणजे विराट कोहलीला भोपळाही फोडता (Viart Kohli Golden Duck) आला नाही. त्याला दुष्मंथा चमीराने बाद केले. पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने जी रिअॅक्शन दिली त्याचा व्हिडिओ (Video Viral) सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा: सुरेश रैनाने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट

लखनौ सुपर जायंटच्या गोलंदाजीची सुरूवात श्रीलंकेचा वेगावान गोलंदाज दुष्मंथा चमीराने केली. त्याने चांगली उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर अनुज रावतला केएल राहुल करवी झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या विराट कोहलीला पुढच्याच चेंडूवर चमीराने बाद करत आरसीबीला सलग दुसरा धक्का दिला.

हेही वाचा: केकेआरच्या 'या' स्टार बॉलरने दिल्या 16 षटकात 190 धावा; अय्यर बसवणार बेंचवर?

विराट कोहलीने बाहेर जाणारा चेंडूवर स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चमीराच्या चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि चेंडू थेट दीपक हुड्डाच्या हातात जाऊन विसावला. विराटला आपण बाद झालो आहेत यावर विश्वासच बसत नव्हता. तो स्वतःवरच हसू लागला. विराट बाद झाल्यानंतर ट्विटवर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: अझहरूद्दीनचा MI ला सल्ला; प्लेईंग इलेव्हनमध्ये तेंडुलकर नाव जोडा, नशीब बदला

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात फक्त 4 वेळा शुन्यावर बाद झाला आहे. यापूर्वी तो 2008 मध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध, 2014 मध्ये पंजाब किंग्जविरूद्ध, 2017 मध्ये केकेआर विरूद्ध आणि आता 2022 मध्ये लखनौ विरूद्ध शुन्यावर बाद झाला. विराट 5 वर्षानंतर आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला आहे.

Web Title: Virat Kohli Golden Duck Smile After Dismissal Video Gone Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..