IPL 2024: 'याचं वेगळंच क्रिकेट सुरू...', सिराजच्या बोलण्याची विराटनं उडवली खिल्ली, RCB च्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल

RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळत आयपीएल 2024 प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे. या सामन्यादरम्यानच्या बेंगळुरूच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
Virat Kohli - Mohammed Siraj
Virat Kohli - Mohammed SirajSakal

RCB Dressing Room Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने रविवारी (12 मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात 47 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बेंगळुरूने प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हानही कायम राखले आहे.

बेंगळुरूचा हा आयपीएल 2024 मधील एकूण सहावा, तर सलग पाचवा विजय होता. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 18 मे रोजी होणाऱ्या सामन्यात मोठा विजय मिळवावा लागणार आहे.

दरम्यान, बेंगळुरूने सलग 5 विजय मिळवण्यापूर्वी सलग 6 पराभव स्विकारले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ते पाँइंट्स टेबलमध्ये तळात होते. मात्र, नंतर सलग 5 विजयांमुळे आता बेंगळुरू पाचव्या क्रमांकावर आले आहेत.

Virat Kohli - Mohammed Siraj
टी-20 वर्ल्डकपपूर्वी दिग्गज दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती! बोर्डाने दिली माहिती

दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर बेंगळुरू संघाने ड्रेसिंग रुममध्ये मोठा जल्लोष केला. यावेळी मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी खेळाडूंचे कौतुक केले. त्यानंतर खेळाडूंही आनंद साजरा केला.

बेंगळुरूने ड्रेसिंग रुममधील आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोहम्मग सिराज, कर्ण शर्मा आणि विराट कोहली सिराजच्या बोलण्याची खिल्ली उडवताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की सिराज म्हणाला, 'काय पुनरागमन केलंय आपण. आपण एकावेळी एकाच सामन्याचा विचार करायचा. प्लेऑफसाठीचे क्वालिफिकेशन आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय आहे, तर वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजी करते, फलंदाजांनी फलंदाजी करणे. आम्हाला फक्त आक्रमक खेळायचे आहे.'

'जर आम्ही पात्र ठरलो, तर चांगलंच आहे. पण जर आपण पात्र नाही ठरलो, तरी आपण जसे क्रिकेट खेळत आहोत, तसेच खेळत राहू.'

त्याचं हे बोलणं ऐकून तिथे शेजारीच बसलेले कर्ण शर्मा आणि सिराज त्याची मजा घेताना दिसत आहे. विराट हसून म्हणाला, 'तो म्हणतोय फलंदाजांनी फलंदाजी करायची.'

त्यानंतर सिराज त्याला समजावून सांगतो की 'मानसिकता विकेट घेण्याची असायला हवी, बरोबर ना?' त्यावर विराट म्हणाला, 'याचं काहीतरी वेगळंच क्रिकेट चालू आहे, असं म्हण ना की मला फक्त आता स्टम्प दिसत आहेत.' या व्हिडिओला सध्या मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

Virat Kohli - Mohammed Siraj
IPL 2024 Playoff Scenarios : RCB अन् CSK या दोघांनाही मिळू शकते प्लेऑफची तिकिटे? डोके शांत ठेवून समजून घ्या समीकरण

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 187 धावा उभारल्या. बेंगळुरूकडून रजन पाटिदारने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली, तसेच विल जॅक्सने 41 आणि कॅमेरॉन ग्रीनने 32 धावांची खेळी केली. दिल्लीकडून खलील अहमद आणि रसिख सलाम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 19.1 षटकात सर्वबाद 140 धावाच करता आल्या. दिल्लीकडून कर्णधार अक्षर पटेलने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तसेच शाय होपने 29 धावा केल्या. बेंगळुरूकडून यश दयालने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com