
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (३ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होत आहे. बंगळुरूच्या घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक करण्यासोबतच मोठा विक्रमही केला आहे.