Virat Kohli RR vs RCB : आरआर खतरनाक; शतक करूनही विराट ठरला व्हिलन?

Virat Kohli Century Rajasthan Royals Defeat Royal Challengers Bengaluru
Virat Kohli Century Rajasthan Royals Defeat Royal Challengers BengaluruESAKAL

Virat Kohli Century Rajasthan Royals Defeat Royal Challengers Bengaluru IPL 2024 : आरसीबी अन् विराट कोहली यांच्यातील नातं म्हणजे ये फेव्हिकॉल का जोड हैं टूटेगा नहीं! आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा कोणाच्या...? आरसीबीच्या विराटच्या.... आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतकं कोणाच्या नावावर...? अर्थात आरसीबीच्या लाडक्या विराटच्या नावावर!

राजस्तान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात देखील विराट कोहलीची बॅट तळपली. ऑरेंज कॅपच्या मागं हात धुवून लागलेल्या विराट कोहलीनं आयपीएलमधील आपलं आठवं अन् हंगामातलं पहिलं शतक ठोकलं. विराट कोहलीनं 72 चेंडूत नाबाद 113 धावा ठोकल्या. आता सलामीला येणाऱ्या विराटनं एवढ्या रन्स केल्यात म्हटल्यावर आरसीबीनं नक्कीच 200 धावांचा टप्पा पार केला असणार?

Virat Kohli Century Rajasthan Royals Defeat Royal Challengers Bengaluru
MI vs DC IPL 2024 : मुंबईला प्रतीक्षा विजयाच्या सूर्योदयाची! दिल्लीविरूद्ध स्काय येणार का पल्टनच्या कामाला?

तर माशी इथंच शिंकली! विराट कोहलीनं वैयक्तिक धावांचा पाऊस पाडला मात्र आरसीबीच्या वाळवंटात हा पाऊस कधी मुरून गेला कळालंच नाही. बर विराट कोहलीनं 156 च्या स्ट्राईक रेटनं धावा करूनही आरसीबीच्या पराभवाचा धनी विराट कोहलीच का?

तर टी 20 क्रिकेट आता बदलत आहे. आता 150 चं स्ट्राईक रेटनं शतक ठोकूनही उपयोग होत नाही. या धावा तोकड्याच पडतात! कारण विराट कोहलीने या 113 धावा करण्यासाठी 72 चेंडू घेतले. म्हणजे विराट कोहलीनं एकट्यानं 12 षटकं खेळली. आरसीबीच्या इतर फलंदाजांनी आठ षटकं खेळली त्यात झाल्या 70 धावा. विराट सेट असूनही आरसीबीनं शेवटच्या 5 षटकात फक्त 52-53 धावाच केल्या.

यंदाच्या हंगामात पोरं 200 काय 250 च्या स्ट्राईक रेटनं धावा करतायत. जरी त्यांच्याकडून शतकी खेळी होत नसली तरी ते 15-16 चेंडूत 40-45 धावा करून आपल्या संघाला झपाट्यानं धावा करून देत आहेत. यामुळं संघ कधी 200 धावांचा टप्पा पार करतोय हे कळत सुद्धा नाहीये.

बरं या 200 धावा प्रतिस्पर्धी संघ चेस देखील करतोय. त्यामुळं 200 धावा देखील सेफ टोटल नाहीये. अशा परिस्थितीत आरसीबीच्या विराटचं 12 षटकातलं शतक कुठं पुरायचं. त्यामुळं विराट कोहलीला आता टी 20 क्रिकेटमध्ये बदल्या हवेप्रमाणं स्वतःला देखील बदलायला हवं.

नव्या टी 20 दुनियेते विराटकडून संथ शतकापेक्षा इम्पॅक्टफूल 50-60 धावांच्या खेळीची अपेक्षा आहे. विराट यंदाच्या हंगामात धावा करतोय मात्र तो ज्या स्ट्राईक रेटनं धावा करतोय त्या धावा संघाच्या कामी येताना दिसत नाहीयेत. आरसीबीची दुसरी फायर पॉवर देखील फुसकी निघाली आहे. त्यामुळं विराटची ही अँकर इनिंगवाली भाबडी संकल्पना उघडी पडली आहे.

धोनीनं या वयात ती गोष्ट साध्य करून दाखवली. त्यानं दिल्लीविरूद्ध 16 चेंडूत 37 धावा चोपल्या. चेन्नई सामना जिंकली नाही मात्र जिंकण्याची आशा मात्र नक्कीच निर्माण करून गेली.

Virat Kohli Century Rajasthan Royals Defeat Royal Challengers Bengaluru
Virat Kohli RR vs RCB : हंगामातलं पहिलं... IPL मधलं आठवं शतक ठोकत विराट म्हणतो अती आक्रमकपणा...

राहिली गोष्ट आरआरची तर आरआर यंदाच्या हंगामात खतरनाकच आहे. 125 धावांची सलामी देणाऱ्या आरसीबीला त्यांनी 183 धावात रोखलं. याचं श्रेय युझवेंद्र चहल अन् आर. अश्विन या कसलेल्या फिरकी जोडीला जातं. अश्विननं सातची तर चहलनं साडेआठची इकॉनॉमी राखली.

फलंदाजीत यशस्वी जयस्वालच्या बॅटचं ग्रहण अजून काही सुटलं नाही. मात्र जॉस बटलरनं जबाबदारी स्विकारली. विराट अन् फाफच्या 125 धावांच्या भागीदारीला संजू अन् बटलर जोडीनं 148 धावांची भागीदारी रचत चोख प्रत्युत्तर दिलं. स्ट्राईक रेटच्या बाबतीत दोघंही जवळपास 170 च्या पार पोहचले.

ज्यावेळी तुम्ही 15 व्या षटकात 150 च्या आसपास असा त्यावेळी तुम्हाला 200 धावांचं टार्गेट पार करण्यात अडचण येत नाही. हेच या जोडीनं दाखवून दिलं. आरसीबी अन् आरआरमध्ये हाच फरक होता.

बाकी सोनारानं आरसीबीचं कान टोचलं आहेत. कर्णधार फाफ ड्युप्लेसिसनं शेवटच्या षटकात आम्ही धावा करण्यात कमी पडलो असं म्हणत अप्रत्यक्षरित्या पराभवाचं खापर हे विराट अन् ग्रीनवर फोडलं. इथंच विराटच्या शतकी खेळीचं मोल क्षणात मातीमोल झालं!

(IPL 2024 Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com