

Virat Kohli returning to Test cricket
esakal
Virat Kohli red ball cricket comeback speculation: भारताचा स्टार खेाडू आणि ‘चेस मास्टर’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली(Virat Kohli) याने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. सध्या तो फक्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे.
२०२४ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटलाही रामराम ठोकला. मात्र त्याच्या फिटनेसकडे पाहता त्याच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.