T20 World Cup 2024 : कोहली-पांड्या टीम इंडियासोबत का गेले नाहीत अमेरिकेला? मोठे कारण आले समोर

Virat Kohli To Miss Warm-Up Game vs Bangladesh : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघातील बहुतेक खेळाडू काल संध्याकाळी अमेरिकेस रवाना झाले.
Virat Kohli To Miss Warm-Up Game vs Bangladesh
Virat Kohli To Miss Warm-Up Game vs Bangladeshsakal

Team India T20 World Cup 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघातील बहुतेक खेळाडू काल संध्याकाळी अमेरिकेस रवाना झाले. वेस्ट इंडीज-अमेरिका येथे संयुक्तपणे होत असलेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचे साखळी सामने अमेरिकेत होणार आहेत. १ जूनपासून स्पर्धा सुरू होत असून भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी होणार आहे.

रवाना झालेल्या खेळाडूंमध्ये रोहित, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, शिवम दुबे, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल यांच्यासह प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांचे सहकारी होती.

विराट कोहली आणि हार्दिक पांड्याशिवाय भारतीय क्रिकेट संघाची पहिली तुकडी टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. दोघेही पहिल्या बॅचसोबत अमेरिकेला का गेले नाहीत यामागचे मोठे कारण समोर आले आहे.

Virat Kohli To Miss Warm-Up Game vs Bangladesh
Milind Vasant Bhondve : क्रिकेट खेळताना खेळाडूचा हृदयविकाराने सांगवीत मृत्यू

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कोहलीने त्याचा ब्रेक थोडा वाढवला आहे. त्यामुळे कोहली टीम इंडियाच्या पहिल्या बॅचसह अमेरिकेला रवाना होऊ शकला नाही. त्याचे पेपर वर्क बाकी आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'विराटने बीसीसीआयला सांगितले आहे की तो संघाशी उशीराने जोडला जाईल, त्याचमुळे बीसीसीआयने त्याच्या विसाची अपॉइंटमेंट उशीराने ठेवली आह. तो ३० मे रोजी न्युयॉर्कला जाणे अपेक्षित आहे. बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली आहे.'

दुसरीकडे, अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. हार्दिक लंडनहून एकटाच अमेरिकेला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत काही ठीक नसल्याचीही बातमी आहे. असे म्हटले जात आहे की दोघेही लवकरच वेगळे होऊ शकतात.

आता यात किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल. फिटनेसशी संबंधित समस्यांशी झुंज दिल्यानंतर हार्दिकची आयपीएलमधील कामगिरी काही खास नव्हती. यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत येणाऱ्या बातम्या कोणत्याही खेळाडूसाठी अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

Virat Kohli To Miss Warm-Up Game vs Bangladesh
KKR vs SRH Final: IPL ट्रॉफीसाठी भिडणार कोलकाता-हैदराबाद! जाणून घ्या कोण कोणाला ठरलंय वरचढ अन् फायनलचा रेकॉर्ड

विराट कोहली 30 मे रोजी अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. तर भारतीय संघ 1 जून रोजी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. आता प्रश्न असा आहे की विराट कोहली टीम इंडियाच्या एकमेव सराव सामन्यात खेळू शकणार का? कारण लांबचा प्रवास केल्यानंतर विराट थेट सराव सामना खेळायला जाणार का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com