Virat Kohli : 'मी काहीही चुकीचं...' गंभीर सोबतच्या भांडणानंतर 5 दिवसांनी विराट कोहलीने BCCIला लिहिले पत्र

 Virat Kohli-Gautam Gambhir Controversy
Virat Kohli-Gautam Gambhir Controversy
Updated on

Virat Kohli vs Gautam Gambhir : काही दिवसापूर्वी विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानावर भिडले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सामना संपल्यानंतर गंभीर आणि कोहली यांच्यात जोरदार वाद झाला.

कोहलीचा नवीन-उल-हकसोबतही वाद झाला. यानंतर बीसीसीआयने बंगळुरूचा स्टार फलंदाज कोहली आणि लखनऊचा मेंटर गंभीर यांना मॅच फीच्या 100 टक्के आणि नवीन 50 टक्के दंड ठोठावला.

 Virat Kohli-Gautam Gambhir Controversy
CSK vs MI IPL 2023: बालेकिल्ल्यात धोनीने मुंबईला चारली पराभवाची धूळ! गुणतालिकेत गाठले दुसरे स्थान

भांडणानंतर 5 दिवसांनी कोहलीने मोठे पाऊल उचलले आहे. त्याने आता बीसीसीआयला पत्र लिहून आपली चूक नसल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की 100% मॅच फी दंडानंतर विराट कोहली बीसीसीआयवर नाराज आहे. याप्रकरणी त्यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसमोर स्पष्टीकरण देताना म्हणाला की, मी नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर यांना काहीही बोललो नाही... तो असेही म्हणाला की, माझी चूक नाही, पण तरीही मला दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना लेखी सर्व गोष्टी सांगितल्या आहेत.

 Virat Kohli-Gautam Gambhir Controversy
CSK vs MI Playing-11: IPL मध्ये आज एल-क्लासिको! वानखेडेतील पराभवाचा बदला घेणार रोहितची पलटण?

लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंतर रेफरीने विराट कोहली आणि गौतम गंभीरला दंड ठोठावला. दोन्ही खेळाडूंना मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय मॅच रेफरीने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना लेव्हल-2 साठी दोषी ठरवले.

दोन्ही खेळाडूंना आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत दंड ठोठावण्यात आला. मात्र, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com