
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर अनेकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांचे काही विधाने चर्चेचा विषय देखील ठरले आहेत. त्यावरून कधीकधी टीकाही होते. आता त्यांना विराट कोहलीचा भाऊ विकास यानेही त्यांना एका गोष्टीवरून सुनावले आहे.
झाले असे की विराट सध्या आयपीएल २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. पण त्याने त्याच्या यशाचा काळ पार केला असल्याचे मांजरेकरांनी म्हटले होते.