Mumbai Indians: 'रोहितच्या नेतृत्वातही मुंबईने सलग 5 सामने हरलेत...', सेहवागचाही हार्दिकला पाठिंबा?

Virender Sehwag on Mumbai Indians Captain: मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्यावर सातत्याने टीका होत असताना विरेंद्र सेहवागनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Virender Sehwag  | Hardik Pandya | IPL 2024
Virender Sehwag | Hardik Pandya | IPL 2024Sakal

Virender Sehwag on Mumbai Indians Captain: मुंबई इंडियन्स संघ सध्या केवळ त्यांच्या मैदानातील कामगिरीमुळेच नाही, तर नेतृत्वबदलामुळेही सातत्याने चर्चेत आहे. सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मुंबई हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

आयपीएलच्या 17व्या हंगामापूर्वी मुंबईने 5 वेळचा आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्माला हटवून हार्दिककडे नेतृत्वाची धूरा सोपवली. ही गोष्ट अनेक चाहत्यांच्या पसंतीस पडलेली नाही. त्यामुळे हार्दिकवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

इतकेच नाही, तर स्टेडियमवरही प्रेक्षकांनी हार्दिकची हुर्यो उडवली. त्यातच आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हार्दिकवर मोठ्याप्रमाणात टीका होत आहे.

Virender Sehwag  | Hardik Pandya | IPL 2024
IPL 2024: राज्याचा संघ सोडला, युवराजचा रेकॉर्ड मोडला अन् आता पंजाबचा तारणहारही ठरला; कोण आहे अशुतोष शर्मा?

दरम्यान, राजस्थान रॉयल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत व्हावे लागल्यानंतर क्रिकबझशी बोलताना माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने म्हटले होते की कदाचीत मुंबई पुन्हा रोहितकडे नेतृत्व देण्याचा विचार करू शकतात.

मात्र, याला विरेंद्र सेहवागने विरोध करत त्याचे मत मांडताना याचीही आठवण करून दिली की रोहितच्या नेतृत्वाखालीही मुंबई संघ सलग 5 सामने पराभूत झाल्यानंतरही 2014 मध्ये प्लेऑफमध्ये पोहचले होते.

सेहवाग म्हणाला, 'या संघाने यापूर्वीही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग 5 सामने हरले आहेत आणि तरीही ते चॅम्पियन झाले होते (वास्तविक प्लेऑफमध्ये पराभूत झाले होते). त्यामुळे ते हार्दिकबाबत देखील आणखी संयम ठेवतील. हे फक्त आकडे आहेत. ते 3 सामने हरले आहेत, पण यापेक्षा अधिक सामने जर ते हरले, तर मात्र संघव्यवस्थापनाच्या संयमाची ही परिक्षा असेल.'

याशिवाय यापूर्वीही संघांचे नेतृत्वबदल झाले असलेल्याचे सेहवागने म्हटले, 'यापूर्वीही 2-3 फ्रँचायझींनी कर्णधार बदलले आहे, पंजाबने असे केले आहे, चेन्नईने असे केले आहेत. चेन्नईने जडेजाला कर्णधारपद दिले होते आणि नंतर धोनीने पुन्हा कर्णधाराची जबाबदारी स्विकारली. पण हे हंगाम चालू असताना घडले होते.'

'मला वाटत नाही की मुंबई इंडियन्स आत्ता कर्णधार बदलण्याचा विचार करत असतील. तुम्ही तीनच सामन्यानंतर कर्णधार बदलू शकत नाही. त्यामुळे संघाला योग्य संदेश जात नाही. मात्र, सात सामन्यांनंतर जेव्हा स्पर्धा अर्ध्यात असेल, तेव्हा ते कामगिरीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात.'

Virender Sehwag  | Hardik Pandya | IPL 2024
MS Dhoni: फक्त 6 धावा अन् धोनी करणार मोठा विक्रम; यापूर्वी CSK साठी एकानेच केलाय असा पराक्रम

दरम्यान, हार्दिक यापूर्वी 2015 ते 2021 पर्यंत मुंबईकडूनच खेळला होता. परंतु, मुंबईने त्याला करारमुक्त केल्यानंतर गुजरात टायटन्सने त्याला संघात घेत नेतृत्वपदही दिले. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने 2022 आयपीएलचे विजेतेपदही मिळवले.

तसेच 2023 मध्येही गुजरात उपविजेते होते. परंतु, 2024 आयपीएलपूर्वी गुजरातने हार्दिकला मुंबईबरोबर ट्रेड केले. त्यामुळे हार्दिक पुन्हा मुंबई संघात सामील झाला. यावेळी त्याला संघात घेण्याबरोबरच मुंबईने त्याला कर्णधारपदही देऊ कले. (Virender Sehwag on Hardik Pandya Captaincy)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com