MI vs GT : 'रोहित, पोलार्ड, बुमराहला आता विश्रांती द्या' | Virender Sehwag Rohit Sharma Jasprit Bumrah Kieron Pollard | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virender Sehwag Says Mumbai Indians Should Rest Rohit Sharma Jasprit Bumrah

MI vs GT : 'रोहित, पोलार्ड, बुमराहला आता विश्रांती द्या'

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) आता प्ले ऑफची चुरस शिगेला पोहचत आहे. मात्र या चुसशीपासून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कोसो दूर आहे. त्यांचे प्ले ऑफसाठीचे सर्व दरवाजे कधीच बंद झाले आहे. आज मुंबई इंडियन्स हंगामातील सध्याची टॉपची टीम गुजरात टायटन्स विरूद्ध भिडणार आहे. या सामन्यासाठी भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) मुंबईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल सुचवले आहेत. त्याच्या मते मुंबईने या सामन्यात त्यांचे रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), कायरॉन पोलार्ड (Kieron Pollard) यासारख्या मोठ्या खेळाडूंना विश्रांती (Rest) दिली पाहिजे.

हेही वाचा: IPL 2022: आईने गर्भपात केला असता तर हा स्टार जगाला मिळाला नसता

गुजरात टायटन्स सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर मुंबई गुणतालिकेत तळात आहे. मुंबईला या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही. त्यामुळे विरेंद्र सेहवाग म्हणतो की, आता वेळ आली आहे की मुंबई इंडियन्सने आपल्या सगळ्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्याची गरज आहे. तुमच्याकडे आता गमावण्यासारखे काही नाही.' सेहवाग पुढे म्हणाला की, 'मुंबईला आता येणाऱ्या तीन चार वर्षासाठी त्यांची बेंच स्ट्रेंथ तपासून पाहायला हवी.' मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यापैकी फक्त 1 सामन्यात विजय मिळवला आहे.

हेही वाचा: BCCI महिला T-20 क्रिकेट स्पर्धेत माया चमकली; महाराष्ट्राला उपविजेतेपद

दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्सने आपल्या 10 सामन्यापैकी 8 सामने जिंकून 16 गुण मिळवले आहेतत त्यांचे रनरेट (+0.158) देखील चांगले आहे. आजचा सामना जिंकून गुजरातला प्ले ऑफमधील आपले स्थान अजून पक्के करण्याची सधी आहे. आजचा सामना जिंकून ते प्ले ऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम होऊ शकतात.

Web Title: Virender Sehwag Says Mumbai Indians Should Rest Rohit Sharma Jasprit Bumrah Kieron Pollard

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top