IPL 2022: आईने गर्भपात केला असता तर हा स्टार जगाला मिळाला नसता

Delhi Capitals Rovman Powell his Mother Struggling Story
Delhi Capitals Rovman Powell his Mother Struggling StoryESAKAL

दिल्ली कॅपिटल्सचा मधल्या फळीतील तगडा फलंदाज रोव्हमन पॉवेल (Rovman Powell) दिवसेदिवस आपल्या फ्रेंचायजीसाठी सामना जिंकून देणाऱ्या खेळी करत आहे. कॅरेबियन क्रिकेट (Caribbean Premier League) सर्किटमधून जगाला एक मोठा स्टार मिळाल्याचेही काही जाणकार बोलत आहेत. आयपीएलमध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर त्याच्यावर इतर टी 20 लीगमध्ये पैशाचा पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. मात्र रोव्हमन पॉवेल या क्रिकेट जगतातील उद्याचा स्टार जन्माला घालणाऱ्या आईने त्याच्यासाठी खूप खस्ता खाल्या आहेत. म्हणूनच पॉव्हेल या यशाच्या धुंदीत देखील आपल्या आईने केलेला (Rovman Powell Mother) त्याग आणि उपसलेले कष्ट (Struggle) विसरलेला नाही.

Delhi Capitals Rovman Powell his Mother Struggling Story
BCCI महिला T-20 क्रिकेट स्पर्धेत माया चमकली; महाराष्ट्राला उपविजेतेपद

कॅरेबियन प्रीमियर लीग लाईफ स्टोरीज या कार्यक्रमात बोलताना रोव्हमन पॉव्हेल त्याच्या आईविषयी भरभरून बोलला होता. ज्यादिवशी पॉवेलची आई जोआन प्लमेर (Joan Plummer) गर्भवती झाल्याचे कळाले त्यावेळी तिच्या जोडीदाराने तिला गर्भपात (Abortion) करण्यास सांगितले होते. मात्र पॉवेलच्या आईने याला साफ नकार दिला. तिने आपल्या जोडीदाराबरोबर काडीमोड घेतला. तिने हे मूल स्वतःच्या हिमतीवर वाढवण्याचा निश्चय केला. गरोदरपणात प्रत्येत महिन्यात पॉवेलची आई स्वत:ला समजावत होती की एक महिना काढला आहे असाच पुढचा महिना देखील काढेन.

पॉवले आपल्या आईबद्दल सांगताना पुढे म्हणतो की, साडेनऊ पाऊंडाचं चंचल पोरगं सांभाळायचं म्हणजे चेष्टा नव्हती. तिने आमच्यासाठी घेतलेल्या कष्टाचे वर्णन कोणत्या शब्दात करू हे कळत नाहीत तिच्याकष्टासमोर सगळे शब्द फिके आहेत. मी तिला आमचं पोट भरण्यासाठी दुसऱ्यांची कपडे धुताना पाहिलं आहे. तिनं आम्हाला जेवण मिळावं शाळेत जाता यावं यासाठी पडेत ते काम केलं आहे.'

Delhi Capitals Rovman Powell his Mother Struggling Story
"मी तुझ्यासोबत बॅटिंग करु शकत नाही"; Maxwell विराटला असं का म्हणाला?

'ज्यावेळी मी अवघड आव्हानांना सामोरे जातो त्यावेळी मी स्वतःला सांगत असतो की मी हे स्वतःसाठी करत नाहीये. मी हे माझ्या आईसाठी करतोय, माझ्या बहिणीसाठी करतोय. मी हे सर्व माझ्या आईला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी करतोय. ती एक जबरदस्त महिला आहे.' पॉवेल जमैकाच्या एका छोट्या वस्तीत दोन खोल्यांच्या, पत्र्याचे छप्पर असलेल्या छोट्या घरात राहत होता. यातील एक खोली जेवण करण्यासाठी वापरली जायची. त्यामुळे पावसाळ्या रात्री सर्व एकाच खोलीत दाटीवाटीने रहायचे. पावसामुळे छत गळायचं गाद्या भिजायच्या अशा परिस्थिती राहणारा रोव्हमन पॉवेल सध्या आयपीएल गाजवत आहे.

Delhi Capitals Rovman Powell his Mother Struggling Story
IPL 2022 : फलंदाजीतील अपयशामुळे हरलो ; धोनी

त्याची यशस्वी होण्याची ही भूक या बिकट परिस्थितीत दडली आहे. त्याने सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध तडाखेबाज अर्धशतक ठोकले. त्यानं उमरान मलिकच्या वेगमावर षटकात षटकार आणि चौकारांची बरसात केली. याबाबत बोलताना पॉवेल म्हणतो की, 'मी एक मोठा क्रिकेटर होण्यासाठी आतूर झालो आहे. मला यशाची मोठी भूक आहे. मला वाटते की माझे नाव जगातील दिग्गज क्रिकेटर्सबरोबर घेतले जावे. ज्यावेळी लोक बसून उत्कृष्ट क्रिकेटर बद्दल चर्चा करतील त्यावेळी त्यांनी रोव्हमन पॉवेलबद्दल चर्चा करावी.' असे असले तरी पॉवेलला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे याची कल्पना आहे. तो म्हणतो की, 'मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला चांगली कामगिरी सातत्याने करायची आहे. माझ्यात सुधारणा करायची आहे. त्यानंतर मी तेथे पोहचेन.'

पॉवेल आपल्या वडिलांबद्दल म्हणतो की, 'मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मी या जगात यावे यासाठी स्पर्म डोनरची भुमिका बजवाली. मला त्यांच्याविषयी राग नाही. त्यांचा शोध घेण्याचे दिवस गेले आता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com