esakal | "मी मूर्ख नाहीये"; वासिम अक्रम का म्हणाला असं.. वाचा सविस्तर | Pakistan Cricket
sakal

बोलून बातमी शोधा

Wasim-Akram

अक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज

"मी मूर्ख नाहीये"; वासिम अक्रम का म्हणाला असं.. वाचा सविस्तर

sakal_logo
By
विराज भागवत

भारतीय खेळाडू आणि इतर खेळाडू सध्या IPLमध्ये खेळत आहेत. या स्पर्धेनंतर T20 World Cup चा थरार रंगणार आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रझाक याने नुकतंच पाकिस्तानी क्रिकेट भारतापेक्षा सरस असल्याचं म्हटलं होतं. तसेच, पाकिस्तानकडे जसा वासिम अक्रम होता, तसा खेळाडू भारताच्या मातीत होऊच शकला नाही, असंही रझाक म्हणाला. आता, त्या कारणामुळे नव्हे तर एका वेगळ्या कारणामुळे वासिम अक्रम चर्चेत आला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान व्हायला आवडेल का? असा सवाल वासिम अक्रमला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, "मी अजिबात मूर्ख नाहीये. सोशल मिडिया आणि प्रसारमाध्यमांवर मी सतत ऐकत असतो की खेळाडूंनी प्रशिक्षक आणि सिनियर खेळाडूंशी गैरवर्तन केलं. त्यांचा मान ठेवला नाही. असं असताना मी अजिबात ते पद स्वीकारणार नाही. आणि तसंही प्रशिक्षक हा स्वत: मैदानात उतरत नाही. खेळाडू स्वत: मैदानात उतरून आपला खेळ खेळतात. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करणं हे प्रशिक्षकाचं मूळ काम असतं. त्यामुळे एखाद्या वेळी जर संघ पराभूत झाला तर प्रशिक्षकाला त्यासाठी जबाबदार धरलं जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे", असं वक्तव्य वासिम अक्रमने केलं.

"जेव्हा तुम्ही एखाद्या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारता त्यावेळी तुम्हाला वर्षातील किमान २०० ते २५० दिवस संघासोबत प्रवास करावा लागतो. इतकं काम मी करू शकत नाही. आणि महत्त्वाची बाब म्हणजे मी इतक्या दिवस माझ्या देशापासून आणि कुटुंबापासून लांब राहू शकत नाही. मी PSL स्पर्धेदरम्यान पाकिस्तानच्या बऱ्याच खेळाडूंशी संवाद साधत असतो. त्यांच्याकडे माझा नंबर आहे. त्यामुळे त्यांना वाटेल तेव्हा ते माझ्याशी संपर्क साधू शकतात", असंही अक्रम म्हणाला.

loading image
go to top