Three Mumbai Indians Players Return Home Before Eliminator Match: मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये एलिमिनेटर लढत खेळणार आहे. ३० मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी MI चे तीन खेळाडू परदेशात परतले आहेत. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील विल जॅक्स, रायन रिकेल्टन आणि कॉर्बिन बॉश हे एलिमिनेटर लढतीत उपलब्ध नसणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी ते राष्ट्रीय कर्तव्यावर मायदेशात परतले आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या या तिन्ही खेळाडूंना आनंदाने निरोप दिला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.