IPL 2025 PLAYOFF QUALIFICATION SCENARIO FOR MI AND DC :
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये गुजरात टायटन्स ( १८ गुण), रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरू ( १७ गुण) व पंजाब किंग्स ( १७ गुण) यांनी प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहेत. चौथ्या क्रमांकासाठी लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स अशी स्पर्धा होती. पण, आता फक्त मुंबई व दिल्ली असे दोनच स्पर्धक राहिले आहेत आणि त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर होणार आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.