IPL 2025 Final : PBKS vs RCB सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय? काय सांगतो हवामानाचा अंदाज? जाणून घ्या नियम

WHAT IF PBKS VS RCB IS WASHED OUT DUE TO RAIN? इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ला नवा विजेता लाभणार हे निश्चित झाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स हे दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या जेतेपदासाठी ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर समोरासमोर येणार आहेत. पण, या सामन्यावरही पावसाचं सावट आहे.
PBKS AND RCB
PBKS AND RCB esakal
Updated on

IPL 2025 final weather forecast for Narendra Modi Stadium : पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ची फायनल ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. RCB ने क्वालिफायर १ मध्ये PBKS चा पराभव केला होता आणि पंजाब त्याची परतफेड फायनलमध्ये करण्यासाठी उत्सुक आहे. काल क्वालिफायर २ चा सामना पावसामुळे मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत लांबला आणि फायनलवरही पावसाचे सावट आहे. क्वालिफायर २ साठी राखीव दिवस नव्हता, परंतु फायनलसाठी राखीव दिवस आहे. पण, पावसामुळे राखीव दिवसही वाया गेला तर कोणाला जेतेपदाची ट्रॉफी मिळणार?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com