Shashank Singh IPL 2024 : पंजाबनं लिलावात ज्याचा केला अपमान त्यानंच मिळवून दिला संघाला विजेत्याचा मान

Shashank Singh IPL 2024 Auction Punjab Kings Controversy
Shashank Singh IPL 2024 Auction Punjab Kings Controversyesakal

Shashank Singh IPL 2024 Auction Punjab Kings Controversy : 

पंजाब किंग्जनं आज गुजरात टायटन्सला त्यांच्याच होम ग्राऊंडवर पराभवाची धूळ चारली. पंजाबनं गुजरातचे 200 धावांचे आव्हान 19.5 षटकात पार केलं. हा अशक्यप्राय विजय मिळवून देण्यात शशांक सिंहनं मोलाचा वाटा उचलला. त्याने 29 चेंडूत 61 धावांची धडाकेबाज खेळी करत गुजरातच्या तोंडचा घास पळवला.

मात्र आता पंजाब किंग्जच्या गळ्यातील ताईत झालेला शशांक सिंहला लिलावावेळी मोठा अपमान सहन करावा लागला होता. पंजाब किंग्जने त्याच्यावर बोली लावून त्याला संघात घेण्यास नकार दिला होता. त्याच शशांकनं पंजाबला आज आपला सर्वात शानदार विजय मिळवून दिला. त्यानं आपली 61 धावांची नाबाद खेळी 6 चौकार आणि 4 षटकारांनी सजवली.

Shashank Singh IPL 2024 Auction Punjab Kings Controversy
GT vs PBKS : पंजाबनं गुजरातच्या तोंडचा घास पळवला; ते 18 वं षटक गिलला पडलं महागात

काय झालं होतं लिलावात?

आयपीएल 2024 साठी लिलाव होत असताना पंजाब किंग्ज शशांक नावाच्या आणखी एका खेळाडूबद्दल गोंधळात पडले. पंजाब संघाला 19 वर्षीय शशांकला विकत घ्यायचे होते. परंतु लिलावात त्यांनी 32 वर्षीय शशांकवर बोली लावली. पंजाबने या खेळाडूला छत्तीसगडमधून विकत घेतले, पण नंतर फ्रँचायझीने त्याला खरेदी करायचे नसल्याचे सांगितले. मात्र बोली लागल्यानंतर संघाने त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जने याबाबतीत सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले होते.

Shashank Singh IPL 2024 Auction Punjab Kings Controversy
IPL 2024 GT vs PBKS : शशांक सिंगचे झुंजार अर्धशतक, पंजाबने गुजरातचा विजयी घास हिरावला

आता ज्या शशांकला घ्यायचं नव्हतं त्याच शशांकनं पंजाब किंग्जला विजय मिळवून दिला आहे. अशा परिस्थितीत आता पंजाब किंग्जच्या संघ व्यवस्थापनाला लिलावात घेतलेल्या निर्णयाबद्दल कोणताही पश्चाताप होणार नाही. गुजरातविरुद्धचा रोमहर्षक सामना जिंकून शशांकने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com