MI vs RCB : एक्स्ट्रा रिव्यूमुळे RCB फॅन्स खवळले! मुंबई इंडियन्ससाठी अंपायरने का घेतला DRS? जाणून घ्या सत्य

Why Did Umpire Nitin Menon Take DRS For MI Even After They Lost All Their Reviews Vs RCB
Why Did Umpire Nitin Menon Take DRS For MI Even After They Lost All Their Reviews Vs RCB sakal

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव करून दुसरा विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या २५व्या सामन्यात धावांचा जोरदार पाऊस पडला. 196 धावा करूनही आरसीबी संघ पराभूत झाला, तर मुंबईने 27 चेंडू शिल्लक असताना 199 धावा करून सामना जिंकला.

फलंदाजीत इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकलं, तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कहर केला. बुमराहने 5 विकेट घेतल्या. या सामन्या दरम्यान, अंपायर नितीन मेनन जोरदार चर्चेत आला आहे. कारण मुंबई इंडियन्सचे रिव्ह्यू संपले असताना पण नितीन मेनन याने त्यांच्यासाठी डीआरएस घेतला अशी चर्चा सोशल मीडिया सुरू आहे. पण यामध्ये काय तत्य आहे हे जाणून घेऊया.....

Why Did Umpire Nitin Menon Take DRS For MI Even After They Lost All Their Reviews Vs RCB
IPL 2024 : दिनेश कार्तिक खेळणार टी-20 वर्ल्ड कप? MI vs RCB सामन्यादरम्यान रोहित शर्माचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

मुंबई इंडियन्ससाठी अंपायरने का घेतला डीआरएस?

आरसीबी डावाच्या 17 व्या षटकात ही घटना घडली. ज्यावेळी आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस मैदानावर खेळत होता. आणि मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. त्याने ऑफ-स्टंपच्या बाहेर एक स्लो बॉल टाकला, जो फॅफ खेळण्यासाठी बाहेर गेला. पण तो हुकला आणि मागे इशान किशनच्या हातात गेला.

Why Did Umpire Nitin Menon Take DRS For MI Even After They Lost All Their Reviews Vs RCB
MI vs RCB : मुंबईच्या विजयाचा सूर्य तळपला; जसप्रीत बुमराचा पाच विकेटचा दणका

पण त्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले की, मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी थेट डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी मुंबई इंडियन्सचे रिव्ह्यू संपले होते. आणि तरी पण नितीनने यांनी डीआरएस कसा घेतला हा प्रश्न चाहत्यांना पडला.

खरं तर, त्यावेळी फाफ डू प्लेसिसच्या बॅटशी चेंडूचा काही संपर्क झाला असे अंपायर मेनन त्यांना त्यावेळी वाटले. त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेतला होता, पण सामन्यानंतर सोशल मीडिया अनेकांनी नितीन मेननवर पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला आहे.

आणि पंचाच्या निर्णयाने तसा फारसा फरक पडला नाही. कारण, RCB ला सामन्यात चार षटके शिल्लक असतानाच पराभव पत्करावा लागला. पण नितीन मेनन मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com