GT vs KKR, IPL 2024: कोलकाताविरुद्ध गुजरात टायटन्सने का घेतला लेवेंडर जर्सी घालण्याचा निर्णय? जाणून घ्या कारण

Gujarat Titans lavender jersey: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अहमदाबादला होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने लेवेंडर रंगाची जर्सी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Gujarat Titans lavender jersey
Gujarat Titans lavender jersey Sakal

Gujarat Titans lavender jersey: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 63 वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना होत आहे. हा सामना नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. गुजरातचे हे घरचे मैदान आहे.

दरम्यान, कोलकाताविरुद्धचा सामना गुजरातचा आयपीएल 2024 मधील 13 वा सामना आहे. मात्र, घरच्या मैदानातील अखेरचा सामना आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने लेवेंडर रंगाची (फिकट जांभळ्या रंगाची छटा) जर्सी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारणही खास आहे.

खरंतर गुजरातचा संघ नेहमी त्यांच्या गडद निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळतो, परंतु कोलकाताविरुद्ध त्यांचा संघ लेवेंडर रंगाची जर्सी घालण्यामागचा उद्देश कर्करोगाविषयी जागरुकता पसरवण्याचा आहे.

Gujarat Titans lavender jersey
Rohit Sharma: फक्त रोहितचाच जलवा! सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडियाची T20 जर्सी लाँच, पण हार्दिककडे दुर्लक्ष, पाहा Video

गेल्यावर्षी देखील गुजरातने घरच्या मैदानातील अखेरच्या साखळी सामन्यात लेवेंडर रंगाची जर्सी परिधान केली होती. लेवेंडर हा रंग सर्वप्रकारच्या कर्करोगांचे प्रतिनिधित्व करतो.

त्यामुळेच गुजरात या रंगाची जर्सी घालून कर्करोगाबद्दल जागरुकतेचा संदेश देणार आहे. गुजरात संघाने दिलेल्या माहितीनुसार कर्करोगाचे लवकरात लवकर निदान आणि त्यावर लवकर इलाज करण्याची आठवण करून देण्यासाठी ही जर्सी खेळाडू घालणार आहेत.

त्याचबरोबर या उपक्रमातून चाहत्यांना कर्करोगापासून बचाव करण्याविषयी जागरुकता पसरवण्यासाठी मदत होईल.

सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या रोगांमध्ये कर्करोगाचा समावेश आहे. कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोक जीव गमावतात.

Gujarat Titans lavender jersey
T20 World Cup 2024 : चिंता कर्णधार अन् उपकर्णधाराचीच! रोहित अन् हार्दिकचं कारायचं तरी काय?

गुजरातला प्लेऑफची संधी, पण...

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परत गेल्यानंतर आयपीएल 2024 साठी गुजरातने शुभमन गिलच्या खांद्यावर नेतृत्वाची धूरा सोपवली. मात्र हार्दिकबरोबरच दुखापतीमुळे मोहम्मद शमीही या आयपीएलमधून बाहेर गेल्याचा मोठा फटका गुजरातला बसला. गेल्या दोन हंगामात अंतिम सामना खेळणाऱ्या गुजरातची यंदा मात्र फारशी चांगली कामगिरी झालेली नाही.

गुजरातने 12 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 7 पराभव स्विकाले आहेत. त्यामुळे सध्या गुजरात 10 गुणांसह पाँइंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहेत. तसेच त्यांना प्लेऑफ गाठण्याची संधीही खूपच कमी आहे.

त्यांचे आव्हान अधिकृतरित्या संपले नसले, तरी त्यांना जर हे आव्हान कायम ठेवायचे असेल, तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय तर मिळवावा लागेलच, पण त्याचबरोबर अन्य संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com