Yuzvendra Chahal | IPL 2024
Yuzvendra Chahal | IPL 2024Sakal

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Yuzvendra Chahal: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला बाद करत युजवेंद्र चहलने टी20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Yuzvendra Chahal T20 Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 56 वा सामना मंगळवारी (7 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात युजवेंद्र चहलने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र दिल्लीकडून जॅक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकं झळकावली. त्यामुळे दिल्लीला चांगली सुरुवात मिळाली होती. पण ते दोघेही अर्धशतकं करून बाद झाले. त्यानंतर मधल्या षटकात दिल्लीची मधली फळी कोलमडली होती.

Yuzvendra Chahal | IPL 2024
Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

या दरम्यान, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला 14 व्या षटकात चहलने बाद केले आणि इतिहास रचला. चहलसाठी पंतची विकेट टी20 क्रिकेट कारकिर्दीतील 350 वी विकेट ठरली. त्यामुळे तो टी20 क्रिकेटमध्ये 350 विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

यापूर्वी कोणत्याच भारतीयाला टी20 क्रिकेटमध्ये 350 विकेट्स घेता आलेल्या नाहीत. चहलने 301 व्या टी20 सामन्यांत खेळताना ही 350 वी विकेट घेतली आहे. सर्वाधिक टी20 विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत त्याच्यापाठोपाठ पीयुष चावला आहे. चावलाने 293 टी20 सामन्यांत 310 विकेट्स घेतल्या आहेत.

Yuzvendra Chahal | IPL 2024
MS Dhoni: धोनीने पंजाबविरुद्ध का केली 9 व्या क्रमांकावर फलंदाजी? खरं कारण आलं समोर

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय (7 मे 2024 पर्यंत)

  • 350 विकेट्स - युजवेंद्र चहल (301 सामने)

  • 310 विकेट्स - पीयूष चावला (293 सामने)

  • 306 विकेट्स - आर अश्विन (319 सामने)

  • 297 विकेट्स - भुवनेश्वर कुमार (281 सामने)

  • 285 विकेट्स - अमित मिश्रा (259 सामने)

चहलच्या आयपीएलमध्येही सर्वाधिक विकेट्स

दरम्यान, चहल टी20 मध्येच नाही, तर आयपीएलमध्येही सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. इतकेच नाही, तर आयपीएलमध्ये 200 विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. सध्या आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 156 सामन्यांमध्ये 201 विकेट्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com