VIDEO : धनश्रीने असे काही कौतुक केले की चहल लाजला

Yuzvendra chahal Wife Dhanashree After Match Video
Yuzvendra chahal Wife Dhanashree After Match Video esakal
Updated on

IPL 2022: राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra chahal) केकेआरविरुद्ध हॅट्ट्रिक विकेट घेत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. युजवेंद्र चहलची ही आयपीएल कारकिर्दितील पहिलीच हॅट्ट्रिक होती. चहलच्या या दमदार स्पेलमुळे राजस्थान रॉयल्स पुन्हा सामन्यात परतली आणि त्यांनी केकेआरचा कडवा प्रतिकार मोडून काढला. या सामन्यात 40 धावात 5 विकेट घेणाऱ्या युजवेंद्र चहलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, चहलच्या या कामगिरीवर त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) जाम खूष झाली होती. ती चहलच्या प्रत्येक विकेटवर जोरदार सेलिब्रेशन करत होती. सामन्यानंतरही धनश्रीने आपला पती युजीचे तोंडभरून कौतुक केले. या कौतुकामुळे युजवेंद्र चहल चक्क लाजला. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Yuzvendra chahal Wife Dhanashree After Match Video Viral)

Yuzvendra chahal Wife Dhanashree After Match Video
इशान किशनच्या एका धावेची किंमत तब्बल 3.15 लाख रूपये
Yuzvendra chahal Wife Dhanashree After Match Video
Video : विराट कोहली शुन्यावर बाद झाला अन् स्वतःवरच हसला

युजवेंद्र चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला होता. त्याने एका षटकाच्या जोरावर संपूर्ण सामन्याचे फासे उलटवले. त्याने 17 व्या षटकात KKR कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केले. अय्यरने 85 धावाची शानदार फलंदाजी केली. यानंतर त्याने पुढच्या दोन चेंडूंवर शिवम मावी आणि पॅट कमिन्सला धावा देत हॅटट्रिक पूर्ण केली. युझवेंद्र चहलने एकूण पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकात केकेआरचा पराभव केला.

Yuzvendra chahal Wife Dhanashree After Match Video
अझहरूद्दीनचा MI ला सल्ला; प्लेईंग इलेव्हनमध्ये तेंडुलकर नाव जोडा, नशीब बदला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com