
भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा देखील क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवत आहे. २५ वर्षीय अर्जुन सध्या आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्ससोबत आहे. काही दिवसांपूर्वीच युवराज सिंगचे वडील योगराज यांनी केलेल्या विधानानंतर तो चर्चेत आला होता.
अर्जुनने योगराज यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे. योगाराज यांनी म्हटले होते की अर्जुनने युवराजकडून प्रशिक्षण घेतले, तर तो तीन महिन्यात ख्रिस गेलसारखा आक्रमक फलंदाज बनेल.