Rishabh Pant : आयपीएल २०२५ मधील अखेरच्या साखळी सामन्यात रिषभ पंतने ११८ धावांची झंझावती खेळी साकारली. झहीर खान म्हणाले, पंतच्या क्षमतेवर आम्ही कधीच शंका घेतली नाही. संपूर्ण हंगाम अपयशी ठरल्यावर अखेरच्या सामन्यातील शतक पंतसाठी आत्मविश्वासवर्धक ठरले.
लखनऊ : आयपीएलच्या पूर्ण मोसमात रिषभ पंत अपयशी ठरत असला तरी त्याची क्षमता आणि गुणवत्तेबाबत कधीच शंका नव्हती, असे मत लखनऊ संघाचे मेंटॉर आणि माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांनी व्यक्त केले.