इराणच्या संघाने स्वतःच्याच देशाचे राष्ट्रगीत म्हणण्यास का दिला नकार? | FIFA World Cup 2022 Iran National Anthem | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup 2022 Iran Football Team National Anthem Controversy

FIFA World Cup 2022 : इराणच्या संघाने स्वतःच्याच देशाचे राष्ट्रगीत म्हणण्यास का दिला नकार?

FIFA World Cup 2022 Iran Football Team National Anthem Controversy : फिफा वर्ल्डकपमधील ग्रुप B च्या पहिला सामना इंग्लंड आणि इराण यांच्यात झाला. हा सामना सुरू होण्यापूर्वीच वादग्रस्त ठरला. इराणच्या फुटबॉल संघाने आपल्याच देशाचे राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देत देशात सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. ज्यावेळी खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये इराणचे राष्ट्रगीत सुरू झाले त्यावेळी इराणचे खेळाडू चिंताग्रस्त चेहऱ्याने शांत उभे राहिले.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 ENG vs IRN : इराणवर अर्धा डझन गोल करत इंग्लंडने वर्ल्डकपची केली धडाक्यात सुरूवात

इराण हा गेल्या दोन महिन्यापासून देशांतर्गत आंदोलनाने पार हादरून गेला आहे. 16 सप्टेंबरला इराणच्या कुर्दिश वंशाच्या 22 वर्षीय माशा अमिनीचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला होता. यानंतर इराणमध्ये आंदोलने सुरू आहेत. अमिनीला इस्लामिक रिपब्लिकच्या महिलांसाठीच्या ड्रेस कोडचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या ड्रेसकोडमध्ये हिजाब घालण्याची सक्ती आहे.

हेही वाचा: Shreyas Iyer : हॉट अश्विनीनं श्रेयस अय्यरला केलं 'हिट' विकेट! सूर्याचा उल्लेख करत हे काय म्हणाली सुंदरा?

दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून काही इराणी खेळाडूंनी राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला. याचबरोबर आंदोलनाला पाठिंबा म्हणून या खेळाडूंनी विजय साजरा करण्यास देखील त्यांनी नकार दिला आहे. अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमधील आंदोलनात जवळपास 400 लोकांचा मृत्यू झाला असल्याच्या दावा इराणमधील मानवाधिकार संघटनांनी केला आहे. दरम्यान, संघातील खेळाडूंच्या या कृतीमुळे इराणचा संघ हा इराणचे प्रतिनिधित्व करतोय की 1979 पासून सत्तेत असलेल्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनचे प्रतिनिधित्व करतोय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फिफा वर्ल्डकप 2022 मधील ग्रुप B च्या सामन्यात बलाढ्य इंग्लंडने इराणचा 6 - 2 अशा मोठ्या गोलफरकाने पराभव केला. हॅरी केनच्या नेतृत्वातील इंंग्लंडला संभाव्य विजेत्यांमध्ये गणले जाते. इंग्लंडने कतारमधील वर्ल्डकपची धाडाकेबाज सुरूवात करून आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. इंग्लंडकडून बुकायो साकाने दोन गोल केले तर रहीम स्टेर्लिंग, ज्यूड बेलिंगहम, मार्कस रॅशफोर्ड आणि जॅक ग्रिलीशने प्रत्येकी 1 गोल केला. इराणकडून मेहदी तारेमीने 2 गोल केले.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....