

Iran Belgium goalless draw match analysis
esakal
FIFA World Cup Iran vs Belgium highlights: अलिझेरा बैरानवंद याने गोलजाळ्यात जातील, असे तब्बल सात फटके अडवले, त्यामुळे इराणने विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमला गोलशून्य बरोबरीत रोखले.
बेल्जियमला उत्तरार्धात १० खेळाडूंसह खेळण्याची वेळ आली होती. बेल्जियमचा गोलरक्षक नॅथन एन्गोय याला ६६व्या मिनिटाला रेड कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले. त्याने फुटबॉल पाठीमागे मारला आणि इराणच्या मेहदी तारेमी याच्याविरुद्ध जाणीवपूर्वक फाऊल केला. या वेळी इराणचा हमखास गोल होऊ शकला असता.