Irani Cup : शेष भारताला इराणी करंडकाचे विजेतेपद; सौराष्ट्रावर ८ गडी राखून दमदार विजय

इराणी करंडकाच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर
Irani Cup
Irani Cup esakal

राजकोट : शेष भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी सौराष्ट्र संघावर ८ गडी राखून दमदार विजय मिळवला आणि इराणी करंडकाच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. सौराष्ट्राकडून मिळालेले १०५ धावांचे आव्हान शेष भारताने २ गडी गमावत झळाळता करंडक पटकावला.

सौराष्ट्राने ८ बाद ३६८ या धावसंख्येवरून मंगळवारी पुढे खेळायला सुरुवात केली. सौराष्ट्राचा दुसरा डाव ३८० धावांमध्ये संपुष्टात आला. शेल्डन जॅकसनने ७१ धावांची, अर्पित वसावडाने ५५ धावांची, प्रेरक मंकडने ७२ धावांची आणि जयदेव उनाडकटने ८९ धावांची खेळी साकारली.२५ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याने ९४ धावा देत सौराष्ट्राचा निम्मा संघ गारद केला. त्याने या लढतीत एकूण ८ मोहरे टिपले. सौरभकुमारने ३ फलंदाज बाद केले.

कुलदीप नेट बॉलर

कुलदीप सेन याने इराणी करंडकात आठ फलंदाज बाद करून लक्षवेधक कामगिरी केली. या युवा खेळाडूची आगामी टी-२० विश्‍वकरंडकासाठी भारतीय संघात निवड झाली नसली, तरी नेट बॉलर म्हणून त्याला संधी देण्यात आली आहे. कुलदीपसोबत चेतन सकारिया व मुकेश चौधरी हेदेखील नेट बॉलरची भूमिका बजावणार आहेत.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र-पहिला डाव सर्व बाद ९८ धावा आणि दुसरा डाव ३८० धावा पराभूत वि. शेष भारत - पहिला डाव सर्व बाद ३७४ धावा आणि दुसरा डाव २ बाद १०५ धावा (अभिमन्यू इस्वरन नाबाद ६३, श्रीकर भारत नाबाद २७, जयदेव उनाडकट २/३७).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com