ENG vs IRE : बालबिर्नेची झुंजार खेळी मात्र इंग्लंडने केले जोरदार पुनरागमन

England vs Ireland  ICC Men's T20 World Cup 2022
England vs Ireland ICC Men's T20 World Cup 2022ESAKAL

England vs Ireland ICC Men's T20 World Cup 2022 : टी वर्ल्डकपच्या ग्रुप 1 मधील इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील इंग्लंडने आयर्लंडचा डाव 157 धावात संपवला. आयर्लंडने पहिल्या 10 षटकात इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. आयर्लंडकडून सलामीवीर आणि कर्णधार अँड्र्यू बालबिर्निनेने 47 चेंडूत 62 धावांची दमदार खेळी करत संघाला 12 षटकात 2 बाद 103 धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्यानंतर मार्क वूड, लिम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी दमदार गोलंदाजी करत आयर्लंडचा डाव 157 धावात संपवला. इंग्लंडकडून मार्क वूड आणि लिम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर सॅम करनने 2 विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली.

England vs Ireland  ICC Men's T20 World Cup 2022
T20 World Cup 2022 : सरावासाठी 42 किमी प्रवास; आयोजकांचा टीम इंडियाला थकवण्याचा प्लॅन?

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने आयर्लंडला पॉवर प्लेमध्येच पहिला धक्का दिला. मार्क वूडने सलामीवीर स्टर्लिंगला 14 धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबिर्ने आणि लॉरकेन टकरने दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचत 12 व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले.

England vs Ireland  ICC Men's T20 World Cup 2022
Phil Simmons : वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांनी दिला राजीनामा

मात्र टकर 34 धावा करून धावबाद झाला आणि आयर्लंडच्या फलंदाजीला गळती लागण्यास सुरूवात झाली. मार्क वूड आणि लिम लिव्हिंगस्टोनने आयर्लंडची अवस्था 5 बाद 132 धावा अशी केली. आयर्लंडचा कर्णधार बालबिर्न देखील 48 चेंडूत 62 धावांची झुंजार खेळी करून बाद झाला.

त्यानंतर सॅम करनने आयर्लंडची शेपूट गुंडाळण्यास फारसा वेळ लावला नाही. त्याने 19 व्या षटकात हँड आणि मॅकार्थेला बाद केले. 20 व्या षटकात बेन स्टोक्सने जोशुआ लिटिलला आल्या पावली माघारी धाडत आयर्लंडचा डाव 157 धावात संपवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com