India Vs Netherlands
India Vs Netherlands esakal

T20 World Cup 2022 : सरावासाठी 42 किमी प्रवास; आयोजकांचा टीम इंडियाला थकवण्याचा प्लॅन?

India Vs Netherlands : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सुपर 12 च्या पहिल्याच रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्स राखून पराभव केला. त्यानंतर भारतीय संघ या विजयाचे फारसे सेलिब्रेशन न करता नेदरलँडविरूद्धच्या सामन्याची तयारी करण्यासाठी सिडनीला रवाना झाला. मात्र सिडनीतील अवस्था पाहून भारताने आयोजक ऑस्ट्रेलियावर नाराजी व्यक्त केली आहे. सरावानंतर भारतीय संघाला थंड जेवण देण्यात आले. याचबरोबर खेळाडूंना सरावासाठी 42 किमी प्रवास देखील करण्यास सांगण्यात आले. खेळाडूंनी सरावासाठी इतका मोठा प्रवास करण्यास नकार दिला.

India Vs Netherlands
Virat Kohli : ...म्हणून विराटनं टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी; शोएबचा अजब सल्ला

एएनआय वृत्तसंस्थेला बीसीसीआयच्या सूत्रांनी माहिती दिली. त्यावरून भारतीय संघ सिडनीत सरावानंतर देण्यात आलेल्या जेवणावर खुश नाही. सरावानंतर भारतीय संघाला गरम जेवण देण्यात आले नाही. जेवणाच्या मेन्यूमध्ये फक्त सँडविच सामील करण्यात आले होते. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 'भारतीय संघाला जे जेवण देण्यात आले ते चांगले नव्हते. त्यांना फक्त सँडविच देण्यात आले. यानंतर आयसीसीला देखील याबाबत नाराजी कळवण्यात आली आहे.'

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद टी 20 वर्ल्डकपमध्ये जेवणाची सोय करते. विशेष म्हणजे दुपारच्या जेवणानंतर आयसीसी कोणतेही गरम जेवण देत नाहीये. द्विपक्षीय मालिकेत जेवणाची सोय ही आयोजक देश करत असतो. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की भारतीय संघ सराव सत्रात देखील भाग घेत नाहीये कारण हॉटेल आणि सरावाचे ठिकाण यांच्यातील अंतर जवळपास 45 मिनिटांचे आहे. भारताला सिडनीजवळील एक छोटेसे शहर ब्लॅकटाऊनमध्ये सराव करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

India Vs Netherlands
T-20 World Cup : भुकेलेल्या रोहित शर्माला मराठी पत्रकाराचा डब्बा, ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची आबाळ

भारताने टी 20 वर्ल्डकपमध्ये पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. भारताने या विजयाबरोबरच गतवर्षीच्या टी 20 वर्ल्डकपमधील पराभवाचे उट्टे काढले. आता भारत 27 ऑक्टोबरला नेदरलँड्ससोबत आपला दुसरा सामना खेळणार आहे. सध्या भारतीय संघ सुपर 12 च्या ग्रुप 2 मध्ये 2 अंकांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे रनरेट +0.050 इतके असून बांगलादेशने देखील एक सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत. मात्र त्यांचे रनरेट हे +0.450 इतके असल्याने ते ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com