NZ vs IRE : न्यूझीलंडविरूद्ध हॅट्ट्रिक घेणाऱ्या जोशुआचे CSK कनेक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joshua Little Hat - Trick IPL Connection

NZ vs IRE : न्यूझीलंडविरूद्ध हॅट्ट्रिक घेणाऱ्या जोशुआचे CSK कनेक्शन

Joshua Little Hat - Trick IPL Connection : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये युएईच्या कार्तिक मयप्पनने पहिली हॅट्ट्रिक केली होती. त्याने पात्रता फेरीत श्रीलंकेविरूद्ध ही कामगिरी केली. आता आयर्लंडच्या जोशुआ लिटिलने सुपर 12 फेरीतील न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात वर्ल्डकपमधील दुसरी हॅट्ट्रिक घेतली. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने 19 व्या षटकात न्यूझीलंडला पाठोपाठ तीन धक्के देत त्यांचा 200 पार धावसंख्या उभारण्याचा मनसुबा उधळून लावला. जोशुआने न्यूझीलंडविरूद्ध हॅट्ट्रिक घेतल्यानंतर क्रिकेट जगतात हा कोण जोशुआ लिटिल अशी चर्चा सुरू झाली आहे. जोशुआचा भारतीय क्रिकेट वर्तुळाशी चांगला जोडला गेला आहे.

हेही वाचा: Virat Kohli Birthday : किंग कोहलीच्या वाढदिवसाआधीच हा काय ट्रेंड सुरू झालाय?

जोशुआचे IPL 2022 कनेक्शन

आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक चेन्नई सुपर किंग्जने आयर्लंडच्या जोशुआ लिटिलची नेट बॉलर म्हणून साईन केले होते. 23 वर्षाचा या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाकडे वेगाने गोलंदाजी आणि स्विंग करण्याची क्षमता आहे. तो डेथ ओव्हरमध्ये देखील धावा रोखण्यात उपयुक्त ठरतोय. 2016 मध्ये त्याने हाँगकाँगविरूद्ध खेळताना आपले आंतरराष्ट्रीय टी 20 पदार्पण केले रोते. जोशुआने 2019 मध्ये इंग्लंडविरूद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. तो आयर्लंड संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे.

भारतात खेळण्याची संधी हुकली

जोशुआ लिटिल फक्त 16 वर्षाचा असताना त्याने निवडसमितीला चांगलेच प्रभावित केले होते. त्याने 2016 च्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप संघात देखील निवड झाली होती. त्याला चांगल्या कामगिरीमुळे 2017 च्या भारतात होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी आयर्लंड संघात निवडण्यात आले होते. मात्र तो परीक्षा असल्याने या दौऱ्यावर येऊ शकला नव्हता. अफगाणिस्तानने आयर्लंडविरूद्धची ही तीन सामन्यांची मालिका 3 - 0 अशी जिंकली होती.

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

अॅडलेड ओव्हलवर सुरू असलेल्या न्यूझीलंड विरूद्ध आयर्लंड सामन्यात 19 वे षटक टाकणाऱ्या जोशुआ लिटिलने दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला 61 धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच तिसऱ्या चेंडूवर नीशमला पायचित पकडले. यानंतर आलेल्या मिचेल सँटनरला ही लिटिलने चकवा देत त्याला देखील शुन्यावर पायचित बाद केले. लिटिलच्या या 19 व्या षटकात घेतलेल्या हॅट्ट्रिकमुळे न्यूझीलंडचे 200 पार जाण्याचे स्वप्न भंगले.