
BCCI | विराट - रोहितवरून इरफान पठाणची बीसीसीआयवर टीका
मुंबई : बीसीसीआयने (BCCI) आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यावरील (West Indies) वनडे संघची घोषणा नुकतीच केली. बीसीसीआयने पहिल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यांच्या संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर उपकर्णधार म्हणून रविंद्र जडेजाची निवड केली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाती प्रमुख खेळाडू विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. (Irfan Pathan Criticize BCCI Decision Give Rest To Virat Kohli and Rohit Sharma In West Indies ODI Series)
हेही वाचा: ICC Test Rankings | सहा वर्षात जे झालं नाही ते झालं! 'विराट' रँकिंगची मोठी घसरण
या विश्रांतीच्या मुद्यावरूनच भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) बीसीसीआयला ट्विट करून चिमटा काढला. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर काही वेळाने पठाणने ट्विट केले की, 'विश्रांती करताना कोणीही परत फॉर्ममध्ये येऊ शतक नाही.' या ट्विटवरून इरफान पठाणने भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना वेस्ट इंडीज दौऱ्यावर विश्रांती देण्यावर नाराजी व्यक्त केल्याचे दिसते.
भारताचे दोन वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत देखील विश्रांती देण्यात आली होती. आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर देखील भारताच्या या दोन मुख्य फलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे.
हेही वाचा: Shikhar Dhawan | विंडीज दौऱ्यात शिखर धवन असणार टीम इंडियाचा कर्णधार
विराट कोहलीचा बॅड पॅच गेल्या काही वर्षापासून संपतच नाहये. याचबरोबर रोहित शर्मानेही मोठी खेळी करून काळ लोटला आहे. अशा परिस्थिती या दोघांना सातत्याने विश्रांती देण्यात आली तर मग हे दोघे फॉर्ममध्ये येणार कधी. रोहित तर दुखापतींमुळे कायम संघातून आत बाहेर होत आहे. इंग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यात देखील त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
वेस्ट इंडीज दौऱ्यावरील भारतीय वनडे संघ
शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
Web Title: Irfan Pathan Criticize Bcci Decision Give Rest To Virat Kohli And Rohit Sharma In West Indies Odi Series
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..