Why Dhoni Dropped Irfan Pathan in 2009 : कर्णधार असताना महेंद सिंह धोनीने आपल्याला संघाबाहेर काढलं, असा आरोप सातत्याने केला जातो. याच यादीत आता भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचाही समावेश झाला झाला आहे. धोनीने आपल्याला संघाबाहेर ठेवलं. असं तो म्हणाला. तसेच 2009 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर आपल्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही, यामागेही धोनीचा हात होता, असा दावाही ही त्याने केला आहे. या दाव्यानंतर क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे.