Irfan Pathan reveals the truth about his IPL commentary exit : आयपीएल २०२५ च्या कमेंट्री पॅनलमधून इरफान पठानचं नाव वगळण्यात आलं होतं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर टीका केल्याने त्याची हकालपट्टी झाल्याची चर्चा त्यावेळी क्रिकेट वर्तुळात सुरु होती. मात्र, रोहित किंवा विराटवर नव्हे तर हार्दिक पंड्यावर टीका केल्याने इरफानचं नाव पॅनेलमधून वगळण्यात आल्याचा दावा आता पुढे आला आहे.