'तुम्ही असे का बोलता सर...' रमजानबद्दलच्या इरफानच्या ट्विटवर कमेंटचा पाऊस | Irfan Pathan Tweet About Ramzan Eid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Irfan Pathan Tweet About Ramzan Eid

'तुम्ही असे का बोलता सर...' रमजानबद्दलच्या इरफानच्या ट्विटवर कमेंटचा पाऊस

मुंबई : कोरोनाचा निर्बंध शिथील झाल्यानंतर आलेली पहिली ईद (Ramzan Eid) देशभर उत्साहात साजरी केली जात आहे. सोमवारी रमजान महिन्याचा शेवटचा दिवस होता. या निमित्त भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) एक फोटो ट्विटरवर शेअर केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊसच पाडला. इरफान पठाणने या फोटोला 'रमदानचा निरोप घेतो.... जीवंत राहिलो तर पुढ्या वर्षी भेट होईलच.' असे कॅप्शन दिले.

हेही वाचा: वडील घरोघरी पोहोचवतात सिलिंडर, भाऊ ऑटोचालक; 9 वी नापास रिंकू सिंगची कहाणी

इरफानने शेअर केलेला फोटो हा एक बहू मजली इमारतीच्या खिडकीजवळ घेतलेला फोटो आहे. या फोटोत जा - ए - नमाज (ज्यावर बसून नमाज पढतात असे वस्त्र) देखील दिसत आहे. या फोटोवर काही नेटकऱ्यांनी इरफान पठाणने रमदान (Ramadan) लिहिण्यावर आक्षेप घेतला. त्यांच्या मते आपण भारतात पिढ्यानपिढ्या रमजान (Ramzan) असा शब्द वापरतो. तर काही नेटकऱ्यांनी इराफानच्या जिवंत राहिलो तर... यावर कमेंट केल्या. त्यांनी इरफानच्या दीर्घायुषी होण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी ईद हा प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण आहे यावेळी ट्विटची भाषा ही सकारात्मक ठेवता आली असती असे नेटकऱ्यांनी सुनावले.

हेही वाचा: IPL सोडून चहलच्या बायकोकडेच नजरा; पाहा तिचा HOT अंदाज

इरफान पठाणचा हा ट्विट नकारात्मक (Negativity) असल्याचे एका नेटकऱ्याने जो हा ट्विट लिहितो आहे त्याच्यामध्ये किती नकारात्मकता भरलेली असेल अशी कमेंट केली. याचबरोबर इरफानच्या रमदानवरूनही अनेक नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काहींनी आपण रमजानच लिहित आणि बोलत आलो आहोत असे सांगितले. तर काहींनी अरबी भाषेनुसार या शब्दाचा उच्चार हा रमदान असा आहे असे सांगितले. इरफानच्या एका चाहत्याने तर तुम्ही असे का म्हणत आहात, प्रभू जी लोकं माणूसकी जिवंत ठेवतात त्यांना कायम जिवंत ठेवतो. तुम्ही तर अस्सल सोनं आहात. प्रभू तुम्हाला आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.'

Web Title: Irfan Pathan Tweet About Ramzan Eid Fans Comments About Negativity Ramadan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top