IND vs SL: अर्शदीप सिंगच्या खराब गोलंदाजीनंतर इरफान पठाणचे ट्विट व्हायरल, 'कायदे में रहोगे तो...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

irfan pathan tweet viral after arshdeep singh

IND vs SL: अर्शदीप सिंगच्या खराब गोलंदाजीनंतर इरफान पठाणचे ट्विट व्हायरल, 'कायदे में रहोगे तो...'

Ind vs SL 2nd T20 : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेला दुसरा टी-20 डावखुरा भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसाठी काही चांगला गेला नाही. अर्शदीप मालिकेतील पहिला सामना खेळला नव्हता. अर्शदीप जेव्हा पुण्याच्या मैदानावर उतरला तेव्हा चाहत्यांना अर्शदीप जुन्याच शैलीत गोलंदाजी करताना दिसेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, सामन्याचा सराव नसल्यामुळे अर्शदीप लयीत दिसला नाही. त्याच्या दोन षटकांच्या कोट्यात त्याने 18.50 च्या अत्यंत खराब इकॉन्मीसह 37 धावा दिल्या. टीम इंडियाने कदाचीत एकदा त्याची ही गोलंदाजी सहन केली असती, पण यात त्याने टाकलेल्या 5 नो-बॉलने अधिक नुकसान केले. या 5 पैकी त्याने पहिल्याच षटकात सलग तीन नो बॉल टाकले.

हेही वाचा: Asia Cup 2023: PCB चेअरमन सेठींना आलाय राग, म्हणतात आता मी देखील घरी बसून...

अर्शदीप सिंगची ही खराब गोलंदाजी पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर बरीच टीका झाली. दरम्यान, भारतीय माजी विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या इरफान पठाणनेही त्याला टाळण्याचा सल्ला दिला. सामन्यादरम्यान इरफान पठाणने ट्विट केले की, "'कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे."

हेही वाचा: IND vs SL: 6,6,6,6,6,6,4,4,4... अक्षरचा तांडव! ९ चेंडू ठोकले जवळपास अर्धशतक

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या टी-20 मध्ये हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या संधीचा फायदा घेत पाहुण्या संघाने कर्णधार शनाका आणि यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिसच्या अर्धशतकांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 206 धावा केल्या.

हेही वाचा: IND vs SL: टीम इंडियामध्ये 'या' खेळाडूची T20 कारकीर्द आता पणाला!

या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही, अर्धा संघ 57 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव (51) आणि अक्षर पटेल (65) यांनी 91 धावांची तुफानी भागीदारी करून विजयाच्या आशा उंचावल्या, पण त्यांना लक्ष्य गाठता आले नाही. भारत हा सामना 16 धावांनी हरला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना राजकोटमध्ये 7 जानेवारीला होणार आहे.