Paris Olympic Trials Rifle-Pistol
Paris Olympic Trials Rifle-Pistolsakal

Paris Olympic Trials Rifle-Pistol : ईशा सिंग, भावेश शेखावत पहिल्या स्थानावर

पॅरिस ऑलिंपिक चाचणी रायफल-पिस्तूल प्रकारात महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये ईशा सिंगने पहिले स्थान मिळवले आहे; तर पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये भावेश शेखावत पहिल्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिंपिक चाचणी रायफल-पिस्तूल प्रकारात महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये ईशा सिंगने पहिले स्थान मिळवले आहे; तर पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये भावेश शेखावत पहिल्या क्रमांकावर आहे.

दिल्लीतील कर्णी सिंग नेमबाजी रेंजवर ही स्पर्धा आजपासून सुरू झाली. ईशाने एकूण ५८५ गुणांची कमाई केली. तसेच रॅपिड फायर प्रकारात तीन सिमरनप्रीत कौर ब्रार हिच्यावर दोन गुणांची आघाडीही घेतली. अनुभवी नेमबाज मनु भाकर हिला ५८२ गुणांसह तिसरे; तर अभिज्ञा पाटील (५७७) आणि ऱ्हिदम संगवान (५७४) हिला अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळाले.

Paris Olympic Trials Rifle-Pistol
Chess Tournament : गुकेश पुन्हा संयुक्तपणे आघाडीवर ; आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा

पुरुषांमध्ये भावेशने सर्वाधिक ५८० गुण मिळवले. सातत्यपूर्ण कामगिरीचा त्याला फायदा झाला. विजयवीर सिद्धू (५७९) आणि अनिश (५७८) यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. विजयवीर आणि अनिश यांनी या प्रकारात ऑलिंपिक कोटा मिळवलेला आहे. उद्या या सर्वांची अंतिम फेरी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com