IND vs BAN : इशान किशनचा द्विशतकी धडाका; अखेर भारताची बांगलादेशमध्ये लाज वाचली

Ishan Kishan Double Century India Defeat Bangladesh
Ishan Kishan Double Century India Defeat Bangladesh esakal

India Defeat Bangladesh by 228 Runs In 3rd ODI : भारताने बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात 227 धावांनी पराभव करत आपली लाज वाचवली. भारताचा सलामीवीर इशान किशनच्या धडाकेबाज 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या जोरावर भारताने 409 धावा केल्या. विजयासाठी 410 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा डाव 182 धावात गुंडाळला. भारताकडून सर्वच गोलंदाजांनी चांगला मारा केला. शार्दुल ठाकूरने 3 तर अक्षर पटेल, उमरान मलिकने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 43 धावा केल्या.

Ishan Kishan Double Century India Defeat Bangladesh
Ishan Kishan Virat Kohli : इशान किशनचा खुलासा; विराटने 'तो' सल्ला दिला म्हणून झालं द्विशतक

भारताने दिलेल्या 410 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने त्यांचे दोन्ही फलंदाज माघारी धाडत त्यांच्यावर दबाव निर्माण केला. अक्षर पटेलने अनमुल हकला 8 तर मोहम्मद सिराजने लिटन दासला 29 धावांवर बाद केले.

यानंतर बांगलादेशचा अनुभवी फलंदाज शाकिब अल हसनने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र मुशफिकूर रहीमने 2 तर यासिर 25 धावा करत त्याची साथ सोडली. अखेर कुलदीप यादवने शाकिबची 43 धावांची झुंजार खेळी संपवत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. शाकिब बाद झाल्यानंतर आलेल्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. अखेर भारताने बांगलादेशला 182 धावांमध्ये गुंडळत सामना तब्बल 227 धावांनी जिंकला.

Ishan Kishan Double Century India Defeat Bangladesh
Ishan Kishan : BCCI चा काखेत कळसा गावाला वळसा! शोधत होतो पंतमध्ये, दम दाखवला किशनने

तत्पूर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून इशान किशनने वनडे कारकिर्दितील आपले पिहले शतक त्या पाठोपाठ द्विशतक ठोकले. तर विराट कोहलीने 72 वे आंतरराष्ट्रीय शकत ठोकत रिकी पॉटिंगला मागे टकाले.

विराट (113) आणि इशान किशन (131 चेंडूत 210 धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 305 धावांची भागीदारी रचल्यानंतर भारताची मधील फळी ढेपाळी होती. केएल राहुल 8 तर श्रेयस अय्यर 3 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सहाव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचत भारताला 390 धावांपर्यंत पोहचवले. अक्षर 20 धावा करून बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने 27 चेंडूत 37 धावा करत भारताला 400 चा टप्पा ओलांडून दिला.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com