Ind vs Sl : 'इशान तुझा करुण नायर झाला…' द्विशतकानंतरही पहिल्या वन-डेतून बाहेर

ishan kishan dropped for first odi ind vs sri lanka confirms captain rohit sharma karun nair
ishan kishan dropped for first odi ind vs sri lanka confirms captain rohit sharma karun nair sakal

भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका (IND vs SL) मंगळवारपासून सुरू होणार आहे. पहिला सामना बारसापारा स्टेडियमवर होणार आहे. बांगलादेश दौऱ्यानंतर भारताचा हा पहिलाच सामना असेल.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात इशान किशनने द्विशतक झळकावले होते. दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी खेळताना यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने 131 चेंडूत 210 धावा केल्या होत्या.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात संधी नाही

ईशान किशन श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार नाही. असे वक्तव्य संघाचा कर्णधार रोहित शर्माने केले आहे. रोहित म्हणतो की शुभमन गिलला पुरेपूर संधी द्यावी लागेल आणि या कारणामुळे इशान प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असेल.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारताचा कर्णधार म्हणाला, आम्ही ईशान किशनला खेळवू शकणार नाही हे दुर्दैव आहे. शुभमन गिलला पुरेपूर संधी द्यायची आहे.

ishan kishan dropped for first odi ind vs sri lanka confirms captain rohit sharma karun nair
खच्चून भरलेली बस पलटी! छतावरही बसले होते प्रवासी; भीषण अपघाताचा Video Viral

शुभमन गिलला संधी

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत शुभमन गिल टीम इंडियाचा भाग नव्हता. इशान किशनने शिखर धवनसोबत ओपनींग केली होती. सतत फॉर्मशी झगडणाऱ्या धवनला संघातून वगळण्यात आले आहे. आता इशानला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.

2019 मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलने 15 डावात 57 च्या सरासरीने आणि 99 च्या स्ट्राइक रेटने 687 धावा केल्या आहेत. त्याने 4 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

दुसरीकडे, इशान किशन 2021 मध्ये भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्याने 9 डावात 53 च्या सरासरीने आणि 112 च्या स्ट्राईक रेटने 477 धावा केल्या आहेत. त्याने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहेत.

ishan kishan dropped for first odi ind vs sri lanka confirms captain rohit sharma karun nair
Ind vs SL : शमीचा १ कोटी किमतीच्या कारसोबत फोटो; चाहते म्हणाले, 'भावा जरा…'

नायर त्रिशतकानंतरही संघाबाहेर

भारतीय संघासाठी करुण नायरने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावले होते. कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो वीरेंद्र सेहवागनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज होता.

यानंतरही पुढच्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याला काही संधी मिळाल्या आणि तो कायमचा संघाबाहेर गेला. त्यामुळे इशान किशनचा करुण नायर पार्ट 2 ठरणार असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात आहे.

ishan kishan dropped for first odi ind vs sri lanka confirms captain rohit sharma karun nair
Video : अमृता फडणवीसांपुढे माधुरीही फिकी! नवीन डान्स व्हिडीओ एकदा पाहाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com