
खच्चून भरलेली बस पलटी! छतावरही बसले होते प्रवासी; भीषण अपघाताचा Video Viral
Bus Accident Viral Video : पश्चिम बंगालमधील बर्दवानमधील कटवा येथे प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रितपणे उलटल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघाताचा वेदनादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या अपघातात बस उलटल्यानंतर बसच्या छतावर बसलेले प्रवासी बसखाली कसे बसखाली कसे गाडले गेले हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 40 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
हेही वाचा: Video : अमृता फडणवीसांपुढे माधुरीही फिकी! नवीन डान्स व्हिडीओ एकदा पाहाच
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार , पूर्व बर्दवान जिल्ह्यातील कटवा-बीरभूम महामार्गावर ही घटना घडली. बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. यावेळी काही प्रवासी बसच्या छतावरही बसले होते. बस पलटी होताच ते थेट जमिनीवर पडले. सर्व जखमींना काटवा उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा: Pune Sextortion : पुण्यात तिशीतल्या तरूणाचं सेक्सटॉर्शन; आत्महत्या करेन म्हणत उकळले पैसे
भरधाव वेगाने येणारी बस अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. बस प्रवाशांनी भरलेली असल्याचे दिसून येत आहे. या अपघातादरम्यान अनेक वापरकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आणि मृत आणि जखमींबद्दल शोक व्यक्त केला.