Wi vs Ind Test : ईशान किशनने पंतचे दरवाजे केलं बंद? भन्नाट झेल पकडल्याने उडाली खळबळ

Ishan Kishan
Ishan KishanSAKAL

Ishan Kishan Wi vs Ind Test : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ज्याचा पहिला सामना कालपासून सुरू झाला आहे. अपेक्षेप्रमाणे संघाने पहिल्याच डावात वेस्ट इंडिजचा पराभव केला. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ 150 धावा करू शकला. यानंतर भारताने एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या.

भारताकडून अश्विनने 5 आणि जडेजाने 3 विकेट घेतल्या. यासह अश्विनने आपल्या 700 विकेट्स पूर्ण केल्या. यासोबतच ईशान किशनने एवढा भन्नाट झेल घेतला, ज्यानंतर पंतला पुनरागमन करणे कठीण जाईल असे सर्वजण म्हणत आहेत.

आधी तुम्ही हा व्हिडिओ पहा....

Ishan Kishan
Brij Bhushan Singh: 'मी छातीवर नव्हे तर पोटावर हात ठेवला पण...' ब्रिजभूषण यांचं स्पष्टीकरण, मुलाच्या आत्महत्येचा देखील केला उल्लेख

ईशान किशनचा भन्नाट झेल

ईशानने अत्यंत चपळाईने खालचा झेल कसा पकडला ते तुम्ही पाहिले. हे बघायला सोपे वाटत असले तरी असे झेल पकडणे खूप अवघड आहे. म्हणजेच दररोज ईशान किशन आपल्या विकेटकीपिंगमध्ये मास्टर होत आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे पंतला कसोटी सामन्यात पुनरागमन करणे अवघड होईल.

Ishan Kishan
Wi vs Ind Test : पुजारासाठी परतीचा मार्ग कठीण! कर्णधार रोहितच्या वक्तव्याने उडाली खळबळ

टीम इंडियात प्रयोग सुरू

या वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडिया अनेक प्रयोग करत आहे. गिलला तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरवले आहे. यशस्वीसोबत रोहित ओपनिंग करत आहे. कुठेतरी भविष्याची रूपरेषा इथे दिसते. अशा परिस्थितीत ईशानकडे स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. मर्यादित षटकातच्या स्वरूपात ईशानची क्षमता सर्वांनाच ठाऊक आहे. या युवा खेळाडूला कसोटीतही अशीच कामगिरी करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com