Ishan Kishan Gets T20 World Cup Chance After 2 Years
esakal
Ishan Kishan returns to Team India after two years : आगामी टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र, एका खेळाडूच्या निवडीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. कारण या खेळाडूने गेल्या दोन वर्षात भारतीय संघासाठी एकही आंतरराष्ट्रीय टी-२० ( T20 world Cup) सामना खेळलेला नाही. इतकच काय तो बीसीसीआयच्या सेंट्रल कॉट्रकचा देखील भाग नाही. मात्र, तरीही त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून इशान किशन (Ishan Kishan) आहे.