
विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद २३ वर्षीय यानिक सिरने जिंकले. रविवारी (१३ जुलै) सेंटर कोर्टवर झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या कार्लोस अल्काराजला पराभूत करत पहिल्यांदाच विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले. हे सिनरचे एकूण चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. या विजेतेपदासह सिनरने गेल्याच महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये अल्काराजविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपाही काढला.