Video : जसप्रीत बुमराहची आई सांगतेय त्याच्या संघर्षाची कहाणी

टीम-ई-सकाळ
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आज यशाच्या शिखरावर असला तरी कधी काळी त्यानेही खूप संघर्षमय जीवन जगले असल्याचे जसप्रीत बुमराहच्या आईने सांगितले आहे.

पुणे : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आज यशाच्या शिखरावर असला तरी कधी काळी त्यानेही खूप संघर्षमय जीवन जगले असल्याचे जसप्रीत बुमराहच्या आईने सांगितले आहे. एकवेळ अशीही होती की, जसप्रीतजवळ केवळ एकच बुटाची जोड आणि आणि एकच टी-शर्ट असायचा. वयाच्या पाचव्या वर्षी जसप्रीतच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले होते. त्यानंतर त्याला आणि त्याच्या आईला खूप संघर्ष करावा लागला असल्याते जसप्रीतच्या आईने सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका व्हिडिओत जसप्रीत बुमराह आणि त्याच्या आईने दोघांच्या संघर्षकहाणीचे वर्णन केले आहे. जसप्रीत बुमराहच्या आईचे नाव दलजीत बुमराह असून त्यांनी सांगितले की, जेव्हा जसप्रीत पाच वर्षाचा होता, तेव्हा माझ्या पतीचे निधन झाले. त्यांनंतर आमची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि बिकट झाली होती. त्यावेळी कुठलीही वस्तू खरेदी करणे आम्हाला शक्य नव्हते'. जसप्रीतने सांगितले की, माझ्याकडे बुटाची एक जोड आणि एकच टी-शर्ट होता. मी तो धुऊन परत वापरत असयचो असेही जसप्रीतने सांगितले.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला १८ मंत्र्यांचा होणार शपथविधी

जसप्रीतने सांगितले की, लहान असताना मी काही गोष्टी ऐकल्या आहेत की, तुमच्या खेळाने प्रभावित होऊन तुमची निवड राष्ट्रीय संघात होते. परंतु, माझ्या बाबतीत हे खरोखर घडले आहे. २०१३च्या आयपीएल सीजनमध्ये खेळत असताना जसप्रीतची एकदिवसीय क्रिकेट संघामध्ये निवड झाली. त्यानंतर तो जगातील क्रमांक एकचा गोलंदाज बनला आहे. जसप्रीतच्या आईने सांगितले की, 'पहिल्यांदा टीव्हीवर जसप्रीतला खेळताना आयपीएलच्या मॅचमध्ये पाहिले. त्यावेळी डोळ्यातील अश्रू रोखणे मला कठीण झाले होते, असे दलजीत यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jasprit bumrah and his mother daljit remember thier struggling days