INDvsENG : जसप्रीत बुमराहने ब्रॉडची केली विक्रमी धुलाई; युवराजची झाली आठवण

Jasprit Bumrah Hit 35 runs in Stuart Stuart Broad One Over Broke Most runs off an over in Test cricket Record
Jasprit Bumrah Hit 35 runs in Stuart Stuart Broad One Over Broke Most runs off an over in Test cricket Recordesakal

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) स्टुअर्ट बॉडच्या (Stuart Broad) एका षटकात 35 धावा ठोकून विक्रम केला. जसप्रीत बुमराहची ही बॅटिंग पाहून टी 20 वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते त्याची आठवण झाली. जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा बाऊन्सरचा प्लॅन पाठोपाठ पूल शॉट मारत हाणून पाडला. बुमराहने 16 चेंडूत केलेल्या नाबाद 31 धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 416 धावांचा डोंगर उभारला.

Jasprit Bumrah Hit 35 runs in Stuart Stuart Broad One Over Broke Most runs off an over in Test cricket Record
धोनी गुडघेदुखीवर घेतोय चाळीस रुपयाचे आयुर्वेदिक औषध

शतकी खेळी करणारा रविंद्र जडेजा (104) देखील अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने आक्रमक फटकेबाजी करत भारताला 400 चा टप्पा पार करून दिला.

दरम्यान, 84 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने भारताच्या तळातील फलंदाजांना बाऊन्सर टाकत अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार जस्प्रीत बुमराहने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला त्याने ब्रॉड टाकत असलेल्या 84 व्या षटकात तब्बल 35 धावा चोपून काढल्या. जसप्रीत बुमराहने या षटकात चौकारांचा चौकार मारला तसेच दोन षटकार देखील ठोकले. याचबरोबर ब्रॉडने एक वाईड आणि एक नो बॉल टाकून जसप्रीत बुमराहला आयते कोलीत दिले. वाईड बॉलवर बाइज 4 धावा देखील मिळाल्या.

Jasprit Bumrah Hit 35 runs in Stuart Stuart Broad One Over Broke Most runs off an over in Test cricket Record
टीम इंडिया रमली लहानपणीच्या आठवणीत, खेळत आहेत 'चिमणी उड...'

याचबरोबर बुमराहने ब्रायन लाराचा कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला. लाराने 2003 मध्ये पिटरसनच्या एका षटकात 28 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2013 ला जॉर्ज बेलीने जेम्स अँडरसनच्या एका षटकात 28 धावा करत या विक्रमाची बरोबरी केली होती. तर याच यादीत केशव महाराज देखील 2020 मध्ये सामील झाला होता. त्याने जो रूटच्या एका षटकात 28 धावा चोपल्या. या विक्रमाच्या यादीवर नजर टाकली तर कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या पहिल्या चार गोलंदाजांमध्ये इंग्लंडचे तीन गोलंदाज आहेत.

अखेर भारताचा पहिला डाव जेम्स अँडरसनने 416 धावांवर संपवला. त्याने सिराजला दोन धावांवर बाद केले. जसप्रीत बुमराहने 16 चेंडूत नाबाद 31 धावा करून संघाला 400 च्या पार पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com