IND vs USA T20 World Cup : भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहची तब्येत बिघडली, स्पर्धेतून बाहेर पडणार?

Jasprit Bumrah Down with Fever : पहिल्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहची तब्येत अचानक बिघडली असून त्याला ताप आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याला पहिल्या सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
Big Blow for India

Big Blow for India

esakal

Updated on

टी-२० विश्वकप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना आज अमेरिकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यातून बाहेर राहण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्पर्धा सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत आता पहिल्या सामन्यात बुमराहसुद्धा खेळण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com