
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्समध्ये होत आहे. दोन दिवसांचा खेळ संपला असून दुसऱ्या दिवशी सामन्यात इंग्लंडनं वर्चस्व राखलं. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांना भारताच्या जसप्रीत बुमराहने घाम फोडला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात आतापर्यंत भारताकडून जसप्रीत बुमराहशिवाय इतर गोलंदाज विकेट घेऊ शकलेले नाहीत. इंग्लंडच्या तिन्ही विकेट बुमराहनेच घेतल्या आहेत. मात्र त्याच्याकडून एक मोठी चूकही झालीय.