Jasprit Bumrah : बूमचे पाच वर्ष जुने ट्विट व्हायरल, 'कमबॅक'... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jasprit bumrah

Jasprit Bumrah : बूमचे पाच वर्ष जुने ट्विट व्हायरल, 'कमबॅक'...

Jasprit Bumrah Old Tweet : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मैदानापासून दूर गेला आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडला आहे. नुकतेच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले पण दुखापतीमुळे तो संघाबाहेर गेला आहे. आणि टी-20 विश्वचषकात त्याच्या खेळण्याबाबत शंका कायम आहे. दरम्यान त्यांचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs SA : बुमराहच्या जागी सिराज, चाहते गांगूलीवर संतापले

वेगवान गोलंदाज बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. बीसीसीआयने तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचा भाग नसल्याची हे पुष्टी केले आहे. आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो खेळला नव्हता. दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने अद्याप टी-20 विश्वचषकात त्याच्या उपलब्धतेबाबत कोणतेही अधिकृत विधान केले नाही, तरी त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान 4-6 महिने लागतील असे मानले जात आहे.

हेही वाचा: Unmukt Chand : विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराने शेअर केला 'वेदनादायक' फोटो

बुमराहचे एक पाच वर्षांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी पुनरागमनाबद्दल ट्विट केले आहे. 2016 मध्ये पदार्पण करणाऱ्या बुमराहने 28 ऑगस्ट 2017 रोजी एक ट्विट केले होते. स्वत:चा एक फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - कमबॅक हा नेहमी धक्क्यापेक्षा मोठा असतो.

हेही वाचा: Prithvi Shaw : कोण आहे मिस्ट्री गर्ल जिच्या तालावर पृथ्वी शॉ शिकतोय गरबा

बुमराह याआधीही दुखापतींमुळे संघाबाहेर गेला होता. 2018 मध्ये त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती तर 2019 मध्येही तो स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे संघाबाहेर गेला होता. या वर्षी ऑगस्टमध्ये, त्याच्या पाठीला दुखापत झाली. बुमराहने आतापर्यंत 30 कसोटी, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 128, एकदिवसीय सामन्यात 121 आणि T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 70 विकेट्स आहेत.