IND vs SA : बुमराहच्या जागी सिराज, चाहते गांगूलीवर संतापले

चांगला गोलंदाज नाही का? आशिया कपमध्ये विराट कोहलीने एक ओव्हर केली होती...
jasprit bumrah replace mohammed siraj
jasprit bumrah replace mohammed sirajsakal

India vs South Africa T20 Series : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडला आहे. निवड समितीने बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. मोहम्मद शमी या जागेसाठी सर्वात मोठा दावेदार होता. शमीला जागा न मिळाल्याने सोशल मीडियावर चाहते प्रचंड संतापले आहे.

jasprit bumrah replace mohammed siraj
Jasprit Bumrah : टीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. त्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. मोहम्मद शमी देखील कोरोनामधून बरा झाला आहे, तरीही त्याला संघात संधी देण्यात आलेली नाही. तरीही निवडकर्ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले आहे की, चांगला गोलंदाज नाही का? आशिया कपमध्ये विराट कोहलीने एक ओव्हर केली होती, त्याला गोलंदाजी द्या. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले आहे की, मोहम्मद शमीने काय चूक केली आहे.

jasprit bumrah replace mohammed siraj
Womens Asia Cup 2022 : महिला आशियाई टी-20 चा बांगलादेशात आजपासून थरार

टी-20 विश्वचषकात मोहम्मद शमी हा मोठा दावेदार आहे. सुरुवातीला तो किलर गोलंदाजी करतो, फलंदाजाला सावरण्याची कोणतीही संधी देत ​​नाही. त्याचवेळी मोहम्मद शमीचे वैशिष्ट्य म्हणजे तो डेथ ओव्हर्समध्ये जास्त धावा देत नाही.

आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजीमुळे भारताला अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत बुमराहऐवजी मोहम्मद शमीला भारतीय संघात संधी मिळू शकते. शमीने टीम इंडियासाठी 17 टी-20 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com